आंध्र प्रदेश : केमिकल फॅक्टरीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू | पुढारी

आंध्र प्रदेश : केमिकल फॅक्टरीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेश राज्यातील एलुरू जिल्ह्यातील अक्किरेड्डीगुडेममध्ये एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. त्यामध्ये ६ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १२ लोक जखमी झाल्याचीही माहीत समोर येत आहे. मध्यरात्री गॅसगळती कारणाने ही भीषण आग लागली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती आंध्र प्रदेश राज्यातील एलुरू जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राहुल देव शर्मा म्हणाले की, “नायट्रिक एसिड, मोनोमिथाइलच्या गळतीमुळे फॅक्टरीमध्ये आग लागली. आगीची घटना घडली तेव्हा फार्मास्युटिकल प्लांटच्या युनिट नंबर ४ मध्ये १८ व्यक्ती काम करत होते. मृत्यू झालेल्या ६ जणांमध्ये चार कामगार हे बिहारचे होते. दोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.”

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला २५ लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली. आणि जे लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत, त्यांना प्रत्येकी ५ लाख देण्याचीही घोषणा केलेली आहे. साधारण जखमी झालेल्यांना २ लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर लक्ष देण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी या भीषण आगीच्या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

हे वाचलंत का? 

Back to top button