

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' आणि इतर योजनातून देशातील करोडो शेतकऱ्यांना नवीन बळ मिळत आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ट्विवटरच्या माध्यमातून व्यक्त केला.
ट्विटमध्ये माेदी यांनी म्हटलं आहे की, सशक्त शेतकरी ही समृद्ध राष्ट्राची गुरुकिल्ली आहे. देशाला आपल्या शेतकरी बांधवांचा अभिमान आहे. तसेच देशातील शेतकरी अधिक सक्षम झाला तर भारत अधिकाधिक समृद्ध होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकर्यांना नवीन बळ मिळत आहे. देशातील ११.३ कोटी शेतकऱ्यांना या योजनांचा थेट फायदा झाला आहे, ज्यामध्ये 1.82 लाख कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याशिवाय पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत मिळाली आहे. कोरोना महामारी दरम्यान 1.30 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याचा फायदा विशेषतः मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना झाला आहे.
कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत कृषी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1 लाख कोटी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापैकी 11,632 प्रकल्पांसाठी 8,585 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) प्लॅटफॉर्मवर 1.73 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अनेकांनी जवळपास 1.87 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
हेही वाचा