कोरोना आपले रूप बदलत आहे आणि पुन्हा पुन्हा येत आहे : पंतप्रधान मोदी

File photo
File photo
Published on
Updated on

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा कोरोना आपले रूप बदलत आहे आणि तो पुन्हा पुन्हा येत आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार)  दिला. गुजरातमधील 'मॉं उमिया धाम' च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

कोरोना कुठेही गेलेला नाही, तो रूप बदलून पुन्हा पुन्हा येत आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, कोरोना करीत असलेली हानी लक्षात घेता लोकांनी बेफिकीरी दाखवू नये आणि सर्व प्रकारच्या दक्षता घेतल्या पाहिजेत. काेराेना बहुरुपी रूप बदलून कधी येईल, याची काहीच शाश्वती नाही.

कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून व्यापक प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत 185 कोटी डोसेस देण्यात आलेले आहेत. धरती मातेला वाचविण्यासाठी मॉं उमिया धामच्या भक्तांनी नैसर्गिक शेतीची कास धरावी, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news