मुंबई सेंट्रल ते गांधी नगर कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच जोडणार | पुढारी

मुंबई सेंट्रल ते गांधी नगर कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच जोडणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेससोबत नवे विस्टाडोम कोच डबे जोडण्यात येणार आहेत. विस्टाडोम कोच  प्रवाशांना अनेक आधुनिक सुविधा सोबत काचेचे छत आणि खिडक्यांमुळे बाहेरचे सुंदर दृश्यही दिसते.

रेल्‍वे प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने प्रवाशांना लक्झरी सुविधा देण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी आतापर्यंत देशभरातील ४५ गाड्यांमध्ये व्हिस्टाडोम कोच आहेत. यामध्ये काचेची रचना आणि त्यामध्ये देण्यात आलेल्या सुविधा प्रवाशांना खूप भावतात. हे लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेने आता ट्रेन क्रमांक 12009/10 मुंबई सेंट्रल – गांधीनगर राजधानी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये एक विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

11 एप्रिलपासून सेवा सुरू होणार

पश्चिम रेल्वे 11 एप्रिल 2022 पासून मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेसचा विस्टाडोम कोच तात्पुरत्या स्वरूपात जोडणार आहे. या कोचमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या, काचेचे छप्पर, फिरणारी जागा आणि एक विश्रामगृह आहे. ज्यामुळे प्रवाशांना बाहेरच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येईल. या विस्टाडोम कोचमध्ये 44 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल शताब्दी एक्स्प्रेसचे बुकिंग 9 एप्रिल पासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.

हेही वाचा  

Back to top button