मुंबई; पुढारी ऑनलाईन : एसटी कर्मचाऱ्यांनी आज अतिरेक करत करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकच्या दिशेने चप्पल तसेच दगडफेक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
पोलीसांची संख्या मर्यादित असल्याने एसटी कर्मचारी गेटपर्यंत पोहोचले. यावेळी संतप्त झालेल्या जमावाला संयमाने शांत करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांनी आपण शांत बसणार असाल, तर चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले.
दरम्यान, झाल्या प्रकारानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा असल्याचे म्हणाले. अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांशी सर्व चर्चा केल्या आहेत, न्यायालयानेही निर्णय दिला आहे. असे असतानाही पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, महाविकास आघाडी सरकार डोळ्यात खुपत असल्याचेही ते म्हणाले.
ज्या पद्धतीने आंदोलन पाहिलं, सुप्रिया सुळे विनंती करत होत्या, तरीही समोरून भाषा येत होती ती शोभणारी नाही, त्यांचे संस्कार पाहावे लागतील असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचलं का ?