International Dog Day :डॉबरमॅन कुत्र्याची निर्मिती कशी झाली माहितेय? | पुढारी

International Dog Day :डॉबरमॅन कुत्र्याची निर्मिती कशी झाली माहितेय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुत्रा घरी आणण्याचा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो, तेव्हा एक सर्वांत आधी प्रश्न पडतो तो म्हणजे कोणती ब्रीड? जेव्हा संरक्षणासाठी कुत्रा हवा असेल तर सर्वांत वरचा क्रमांक लागतो तो म्हणजे डॉबरमॅनचा. पण तुम्हाला माहिती आहे का की डॉबरमॅन ही ओरिजनल ब्रीड नाही. जर्मनीमध्ये एक टॅक्स कलेक्टरने क्रॉस ब्रिडिंग करत डॉबरमॅनची निर्मिती केली.

डॉबरमॅन निर्माण कसा झाला ही कथा रंजक अशी आहे. जर्मनीतील अपोल्डा येथील टॅक्स कॅलेक्टर कार्ल फेड्रिक लुईस डॉबरमॅन यांनी क्रॉसब्रिडिंग करत या कुत्र्याची निर्मिती केली.

टॅक्स कलेक्शन करताना संरक्षणसाठी सर्वोत्तम असा कुत्रा त्यांना हवा होता. डॉबरमॅनच्या निर्मितीसाठी कोणत्या प्रजातींच्या कुत्र्यांचा संकर करण्यात आला याची नेमकी माहिती आज उपलब्ध नाही. पण रॉटविलर, जर्मन पिन्शर, टेरियर अशा प्रजातींच्या क्रॉस ब्रिडिंगमधून डॉबरमॅनची निर्मिती झाली असं मानलं जातं.

सुरुवातीच्या काळात डॉबरमॅन फारच आक्रमक प्रजाती होती. कालांतराने सिलेक्टिव्ह ब्रिडिंगने डॉबरमॅनचा आक्रमकपणा थोडा कमी करण्यात आला आहे. आताच्या घडीला अमेरिकन आणि युरोपियन अशा दोन डॉबरमॅनच्या प्रजाती आहेत.

डॉबरमॅनला २०व्या शतकात स्वतंत्र ब्रीड म्हणून मान्यता मिळाली. दुसऱ्या महायुद्धात डॉबरमॅनचा वापर लष्करात करण्यात आला होता. पोलीस आणि लष्करी सेवेत डॉबरमॅन मोठ्या प्रमाणावर आहेत.

डॉबरमॅन अत्यंत सतर्क असतात, त्यामुळे सतत भुंकतात असा अनुभव आहे. मध्यम आकार, चपळता, अखूड केस, खेळकरपणा अशी काही वैशिष्ट्ये डॉबरमॅनची आहेत. डॉबरमॅनही ही हुशार प्रजाती असल्याने त्यांना ट्रेनिंग देणं ही सोपं असतं. पण ही जात आक्रमक असल्याने त्याना नियंत्रणात ठेवणे वाटते तितके सोपे नसते. इतर कुत्र्यांप्रमाणे यांनाही पुरेसा व्यायाम द्यावा लागतो.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

डिंपल को सिम्पल नहीं समझनेका ! देवमाणूस फेम अस्मिता देशमुख बरोबर खास गप्पा !

Back to top button