

पुढारी ऑनलाईन डेस्क :
आज राज्यात गुढीपाडवा ( Gudi Padwa) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दोन वर्षांनंतर राज्य कोरोना निर्बंधातून पूर्णपणे मुक्त झाल्याने यंदा हा सण सर्वांसाठीच खास ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडवा सणानिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावे अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हावोत, असा शुभेच्छा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट केला आहे. देशातील काही
राज्यांमध्ये आजपासून नवरात्र उत्सवही साजरा होत आहे. याच्याही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना शुभेच्छा
दिल्या आहेत.
गेली दोन वर्ष कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी राज्यात अनेक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे एकुण
उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या. मात्र राज्य सरकारने ३१ मार्च रोजी सर्व निर्बंध हटवले. तसेच मास्कचा वापरही ऐच्छिक केला आहे. या निर्णयामुळे राज्यात विविध ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तब्बल दोन वर्षांनतर पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे.
हेही वाचलं का?