आज-उद्या ही १० कामे करून घ्याच, अन्यथा १० हजार रुपये दंड भरण्यासाठी ‘खिसा’ गरम ठेवा ! | पुढारी

आज-उद्या ही १० कामे करून घ्याच, अन्यथा १० हजार रुपये दंड भरण्यासाठी 'खिसा' गरम ठेवा !

पुढारी ऑनलाईन डेस्क : वित्तीय वर्ष 2021-22 संपण्याकरिता आता फक्त एक दिवस राहिला आहे. (March Ending). या एक दिवसांमध्ये तुम्हाला ही काही महत्त्वाची कामे पार पाडावी लागणार आहेत. जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नसाल तर याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. यामध्ये बँकिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित काही महत्वाच्या बाबींचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला अशा काही महत्वाच्या कामांबद्दल माहीती देणार आहोत जी तुम्हाला 31 मार्च पूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत.

1. पॅन कार्डला आधार कसे लिंक कराल ?

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याकरिता 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही 31 मार्च पर्यंत पॅन कार्डशी आधार नंबर जोडत नसाल तर ते अवैध ठरवले जाईल. जर कोणाकडे व्यक्तीकडे पॅन नंबर नसेल तर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावरून 20% इतका TDS कापला जाऊ शकतो.

2. लेट व रिव्हाईज्ड रिटर्न फाईल

2019-20 ची प्रलंबित इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल जमा करण्याची तारीख देखील 31 मार्च आहे. कोणत्याही वित्तीय वर्षाकरिता रिटर्न भरण्यासंबंधी अंतीम तारीख संपल्यानंतरही प्रलंबित रिटर्न फाईल जमा करू शकता. पण यासाठी करदात्याला 10 हजार रूपये विलंब शुल्क भरावा लागतो.

जर मुख्य रिटर्न फाईल देतेवेळेस काही चूका झाल्या असतील तर अशावेळी रिवाईज्ड रिटर्न फाईल देणे अनिवार्य असते. आयकर अधिनियम,1961 च्या सेक्शन 139(4) नुसार ही विलंबित आयटीआर फाईल भरणे अनिवार्य आहे. आयकर अधिनियम,1961 च्या सेक्शन 139(5) नूसार रिवाईज्ड रिटर्न जमा करावा लागतो. विलंबित रिटर्न फाईलसाठी 10 हजार इतका विलंब शुल्कासहीत 31 मार्च 2021 पूर्वी जमा करणे अनिवार्य आहे.

3. स्टॉक आणि इक्विटी फंडातून नफा बुक करा

स्टॉक आणि इक्विटी ओरिएंटेड फंडांवर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारला जातो. जर तुम्ही दीर्घकालीन भांडवली नफा मिळाला असेल, तर रु. 1 लाखांपर्यंतच्या नफ्यावर कर सूट मिळवू शकता. ३१ मार्चपूर्वी हा नफा बुक करून कर सवलतीचा लाभ मिळेल. अर्थातच ही कर सूट मिळवण्याची तुमची शेवटची संधी आहे.

यासाठी तुम्ही ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त स्टॉक आणि इक्विटी फंड विकून एक लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळवणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात हेच पैसे पुन्हा गुंतवा. पण या विक्री आणि खरेदी प्रक्रियेत तुम्हाला ब्रोकरेज हाऊसला 1% रक्कम द्यावी लागेल. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ही रक्कम भरावी लागणार नाही, कारण एंट्री लोड आकारला जात नाही आणि एक वर्षानंतर हा फंड विकल्यास एंट्री लोड लागू होणार नाही.

4. इन्कम टॅक्सवर सूट मिळविण्यासाठी गुंतवणूक

आयकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला ३१ मार्चपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 80C आणि 80D सारख्या आयकर कायद्याच्या विविध कलमांतर्गत केलेल्या गुंतवणुकीला कर सवलतीचा लाभ मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते.

5. बँक आणि डीमॅट खात्याचे केवायसी

31 मार्च 2022 पर्यंत, डिमॅट आणि बँक खातेधारकांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. केवायसी अंतर्गत, बँक ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड, पत्ता जसे की आधार, पासपोर्ट इत्यादी अपडेट करण्यास सांगते. यासोबतच तुम्हाला तुमचा आताचा फोटो आणि इतर माहितीही द्यावी लागते. नियमांनुसार, तुमचे केवायसी अपडेट न केल्यास तुमचे बँक खाते बंद होऊ शकते.

त्याचबरोबर, जर तुमच्या डिमॅट खात्याची केवायसी पूर्ण नसेल तर डिमॅट खाते बंद केले जाईल. यामुळे तुम्ही शेअर बाजारात व्यवहार करू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तरी हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. केवायसी पूर्ण झाल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतरच हे केले जाईल.

6. PPF, NPS आणि सुकन्या खात्यात किमान रक्कम जमा असावी

तुमच्याकडे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाती असल्यास, PPF, NPS आणि सुकन्या खात्यांमध्ये किमान रक्कम जमा करावी लागेल. जर या आर्थिक वर्षात त्यामध्ये पैसे नसतील तर खाते सक्रिय ठेवण्यासाठी त्यात काही रक्कम ठेवणे अनिवार्य आहे. PPF आणि NPS मध्ये पैसे जमा न केल्यास ही खाती निष्क्रिय होतील. जर तुम्ही किमान आवश्यक रक्कम ठेवली नसेल, तर त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.

7. बँक खाती लहान बचत योजनांसोबत लिंक करा

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये टाईम डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना किंवा मासिक योजना यासारख्या लहान बचत योजनांचा लाभ घेत असल्यास, तुम्ही ही खाती ३१ मार्चपर्यंत बँकेच्या बचत खात्याशी किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्याशी जोडली पाहिजेत. १ एप्रिलपासून या योजनांचे पैसे बचत खात्यातच उपलब्ध होतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जातील.

8. PM किसान योजनेसाठी e-kyc

जे शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांनी 31 मार्च पर्यंत KYC करणे आवश्यक होती. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ई-केवायसी देखील करू शकता. ३१ मार्चनंतर ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान खात्यात केवायसी केले नाही त्यांना भारत सरकारकडून २,००० रुपये मिळणार नव्हते. पण आता या योजनाधारकांकरिता 31 मार्च तारीख बदलून ती 22 मे केली आहे.

9. फॉर्म 12B जमा करणे गरजेचे

जर तुम्ही 1 एप्रिल 2021 नंतर नोकरी बदलली असेल, तर नवीन कंपनीला फॉर्म 12B द्वारे जुन्या जॉबमध्ये कापलेल्या TDS बद्दल कळवा. जर फॉर्म 12B 31 मार्चपर्यंत सबमिट केला नाही, तर कंपनी अधिक TDS कापू शकते, ज्यामुळे तुमचे नुकसान होईल.

10. प्रधानमंत्री आवास योजनेकरिता अर्ज

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही भारतातील सरकारने लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. या अंतर्गत, सरकार प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना गृहकर्ज व्याज अनुदान देत आहे. जे कमाल 2.67 लाख रुपयांपर्यंत जाते. वेगवेगळ्या उत्पन्न गटांना अनुदानाची वेगवेगळी टक्केवारी दिली जाते. या योजनेचा लाभ ३१ मार्चपर्यंत घेता येणार आहे.

हेही वाचा

Back to top button