मोहम्मद शमीवर हॉलिवूडची पोर्नस्टार भलतीच फिदा ! शमीच्या कामगिरीवर म्हणते…

मोहम्मद शमीवर हॉलिवूडची पोर्नस्टार भलतीच फिदा ! शमीच्या कामगिरीवर म्हणते…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये पदार्पण करत असलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनौ जायंट्समध्ये पहिली लढत झाली. या सामन्यात गुजरातकडून मोहम्मद शमीने केलेल्या कामगिरीने गुजरातने सहज विजय मिळवला.

त्याने लखनौचा कॅप्टन केएल राहुलला शुन्यावर बाद करत पहिला तगडा हादरा दिला. त्यानंतर शमीने क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडेला बाद करत लखनौला बॅकफूटवर ढकलले. पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी झाल्याने शमीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.

त्याच्या या कामगिरीनंतर एक भलतीच घटना घडली. हॉलिवूडची प्रसिद्ध पोर्नस्टार केन्ड्रा लुस्टने शमीच्या कामागिरीचे कौतुक करणारे ट्विट केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. तिने ट्विट करून शमीच्या कामगिरीचे अभिनंदन केले. त्यामुळे शमीचे चाहतेही गोंधळात पडले. ती सुद्धा शमीची फॅन आहे याची जाणीव कोणालाच नव्हती.

ती ट्विटमध्ये नक्कीच मोहम्मद शमीने जबरदस्त केला. या ट्विटमध्ये तिने शमीला टॅग करत इमोजी सुद्धा टाकला आहे. त्यानंतर हे ट्विट भारतात चांगलेच व्हायरल झाले आणि अर्थातच अनेक भन्नाट मिम्स सुद्धा पहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kendra Lust™ (@kendralust)

दरम्यान, शमीने पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करताना आयपीएलमधील इतर संघांनाही एक प्रकारे इशारा दिला. त्याला आजपर्यंत पर्पल कॅपचा मानकरी होता आलेलं नाही, पण यावेळी त्याचे लक्ष नक्कीच कॅपकडे असेल.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news