NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांच्या कोठडीत ११ एप्रिलपर्यंत वाढ | पुढारी

NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांच्या कोठडीत ११ एप्रिलपर्यंत वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांच्या कोठडीत स्थानिक न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. एका कथित ‘योगी’च्या इशाऱ्यावरून शेअर बाजाराचे कामकाज चालविल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे. त्याशिवाय एनएसई को-लोकेशन गैरव्यवहार प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत.

दरम्यान, कोठडीदरम्यान चित्रा रामकृष्ण  Chitra Ramakrishna यांचे हस्तलिखित घेण्यास न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे. एनएसईचे तत्कालीन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम हेही या प्रकरणात आरोपी आहेत. आयकर विभागाने अलीकडेच या प्रकरणी मुंबई आणि चेन्नई या ठिकाणी छापे टाकले होते. एनएसई गैरव्यवहार प्रकरणातील दोन आरोपींवर भांडवली बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या सेबीचीही नजर आहे. गत सुनावणीवेळी चित्रा रामकृष्ण  यांची घरचे जेवण देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button