‘त्‍यांची’ एक कृती ठरली हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक | पुढारी

'त्‍यांची' एक कृती ठरली हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरलेली घटना घडली. नाहरू खान यांनी पशुपतिनाथ मंदिराच्या परिसरात ३७ क्विंटलची महाघंटा बसवली आहे. ही महाघंटा लोकांना दर्शन घेतल्यानंतर पाहण्यासाठी मंदिराच्या परिसरात ठेवण्यात आली होती. नाहरू खान यांनी ही महाघंटा देणगी स्‍वरुपात दिली आहे. लवकरच या महाघंटेचे मुख्य़मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून, नाहरू खान यांची कृती  हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरली आहे.

नाहरू खान हे गेली अनेक वर्ष समाजसेवेत अग्रेसर आहेत. नाहरू खान  यांनी पशुपतिनाथ मंदिरासाठी जनरेटर दान केले होते. ३७ क्विंटलची ही महाघंटा पितळ आणि तांब्यापासून बनवण्यात आली आहे. ही देशातील सर्वांत मोठी घंटा आहे, अशी माहिती मंगसौरचे आमदार यशपाल सिंग सिसोदिया यांनी दिली.

 मंदसौर येथील मंदिरातील महाघंटा  प्रदर्शनासाठी ठेवलेले वस्तू  असल्‍याचे मला वाटले. याबाबत मी नाहरू खान यांच्याशी चर्चा केली.  सध्या ही महाघंटा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असल्‍याचे  मंदसौरचे जिल्हाधिकारी गौतम सिंग यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button