प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सलग दुसऱ्यांदा बहुमान

पणजी : पुढारी ऑनलाईन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एमएल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेत्यांची उपस्थित होती. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
आज, सोमवारी (दि.२८) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमममध्ये शपथविधी सोहळा झाला. सोहळ्यादरम्यान स्टेडियममध्ये लोकांची मोठी उपस्थिती होती. गोव्याच्या इतिहासात हा शपथविधी पहिल्यांदाच अभूतपूर्व असा झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
Shri @DrPramodPSawant takes oath as Goa Chief Minister for the 2nd consecutive term. pic.twitter.com/qEELCjeQgl
— BJP (@BJP4India) March 28, 2022
गोवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १८ दिवस झाले. देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांत भाजपाने यश मिळवले. संपूर्ण देशासह गोव्यात होणारा शिगमोत्सव आणि होळी यामुळे इतर राज्यांतील शपथविधी सोहळा थोडा विलंबाने पार पडला.
या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने भाजपला विधानसभेच्या एकूण 40 पैकी 20 जागांवर विजयी केले असून, भाजपच्या सरकारला तीन अपक्ष आणि 2 आमदार असलेल्या मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही पुढील पाच वर्षांसाठी भाजपचे डबल इंजिन सरकार कार्यरत राहणार आहे.
Pramod Sawant takes oath as Goa Chief Minister for the 2nd consecutive term pic.twitter.com/eaQVS46583
— ANI (@ANI) March 28, 2022