temple in kashmir : पंडितांनी काश्मीर सोडल्यानंतर कोण करतय तेथील मंदिराची देखभाल

temple in kashmir : पंडितांनी काश्मीर सोडल्यानंतर कोण करतय तेथील मंदिराची देखभाल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या निर्मितीनंतर काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची सगळीकडे चर्चा आहे. कसे त्यांना त्यांच्याच घरातून हाकलून दिले आणि घरोघरी भटकायला सोडले. या घटनेनंतर अनेक मंदिरे बंद (temple in kashmir) करण्यात आली असून काही मंदिरांमध्ये मुस्लिम समाजाचे लोक पूजा करतात. या मुस्लिम धर्मगुरूंनी काश्मिरी पंडितांचा वारसा आदराने जपला आहे. हे पुजारी मंदिराची देखभाल करतात आणि देवाची सेवा करतात. वास्तविक, या मंदिरांमध्ये काही मंदिरे आहेत, जी ९०० वर्षे जुनी आहेत. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल…

पायर शिव मंदिर (temple in kashmir)

काश्मीरच्या पुलवामा भागात एक शिवमंदिर आहे, ज्याला पायर शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. पूर्वी या मंदिराची जबाबदारी काश्मिरी पंडितांकडे होती. पण, आता या मंदिराची देखभाल गुलाम नबी शेख यांच्या कुटुंबाकडे आहे. पायर हे सुमारे 350 कुटुंबांचे मुस्लिम गाव असून नदीच्या काठावर हे मंदिर आहे. या भागाला नोबगरी टेबललँड म्हणतात. हे मंदिर १५०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

गावातील मुस्लीम लोक मंदिराची देखभाल व संरक्षण करतात व पूजेचे काम शेख कुटुंबीय आनंदाने करतात. या मंदिराच्या रक्षणासाठी ग्रामस्थ तत्पर असून अनेक वेळा या मंदिरासाठी अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. हे मंदिर म्हणजे दुर्मिळ सांस्कृतिक वारशाचा भाग आहे आणि भारतीय संस्कृतीचा, सर्वधर्म समभावाचा आदर्श नमुना आहे. जिथे गावातील मुस्लिम लोक मंदिराची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर असतात.

गोपीतीर्थ शिव मंदिर (temple in kashmir)

भारत एकता आणि अखंडतेसाठी ओळखला जातो आणि काश्मीरमधील हे मंदिर त्याचे उत्तम उदाहरण आहे. श्रीनगरच्या जबरावान हिल्समध्ये एक शिवमंदिर आहे, जे गोपीतीर्थ मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर ९०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. काश्मिरी पंडितांच्या पलायनानंतर हे मंदिर रिकामे झाले होते आणि हे मंदिर पाडण्यात येणार होते, तेव्हाच गावातील मुस्लिम कुटुंबांनी हे मंदिर वाचवले आणि त्यानंतर एका मुस्लिम पिता-पुत्रांनी या मंदिराची जबाबदारी घेतली.

हे मंदिर ९०० वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. 34 वर्षीय निसार अहमद अलई हे अनेक वर्षांपासून या मंदिराची देखभाल करत आहेत. निसार बोलू शकत नाही आणि ऐकूही शकत नाहीत. ते दिवसभर मंदिर आणि इतर गोष्टींची साफसफाई करण्यात मग्न असतात. निसार आणि निसारचे वडील वर्षानुवर्षे मंदिराच्या गरजा पूर्ण करत आहेत. गावातील लोकांनी सांगितले की काही कारणास्तव वडील आणि मुलगा नसतील तर गावातील इतर लोक मंदिराची देखभाल करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news