covid new cases : दिवसभरात १ हजार ६६० कोरोनाग्रस्तांची भर, जुन्‍या संख्‍येमुळे कोरोनामृत्‍यू संख्‍येत वाढ | पुढारी

covid new cases : दिवसभरात १ हजार ६६० कोरोनाग्रस्तांची भर, जुन्‍या संख्‍येमुळे कोरोनामृत्‍यू संख्‍येत वाढ

नवी दिल्ली, २६ मार्च, पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या एका दिवसात १ हजार ६६० कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २ हजार ३४९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान, काही राज्यांतील जुन्या कोरोनामृत्यू संख्येची भर पडल्याने शुक्रवारी दिवसभरात ४ हजार १०० कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली. (covid new cases )

देशातील एकूण कोरोनामृत्यूची संख्या त्यामुळे ५ लाख २० हजार ८५५ पर्यंत पोहचली आहे.तर, ४ कोटी २४ लाख ८० हजार ४३६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. दरम्यान सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ७४१ (०.०४%) पर्यंत पोहचली आहे. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के, तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.२५% नोंदवण्यात आला. आठवड्याचा कोरोनासंसर्गदर देखील ०.२९% नोंदवण्यात आला.

कोरोना विरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८२ कोटी ८७ लाख ६८ हजार ४७६ डोस लावण्यात आले आहेत. तर, २ कोटी २४ लाख ५ हजार २२७ बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लावण्यात आले आहे.

covid new cases : १६ कोटी ४१ लाख ५८ हजार ३६६ डोस शिल्लक

१२ ते १४ वयोगटातील बालकांना १.०७ कोटी डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८४ कोटी ४० लाख २६ हजार ५५५ डोस पैकी १६ कोटी ४१ लाख ५८ हजार ३६६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ७८ कोटी ६३ लाख ३ हजार ७१४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ६ लाख ५८ हजार ४८९ तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

देशातील बूस्टर डोसची स्थिती

१) आरोग्य कर्मचारी ४४,०९,०४०
२) फ्रंटलाईन वर्कर्स ६७,६९,१०५
३) ६० वर्षांहून अधिक १,१२,२७,०८२

हेही वाचलं का?

 

Back to top button