उपाशी पोटी चहा पिण्याचे परिणाम माहीत आहे का ?

उपाशी पोटी चहा पिण्याचे परिणाम माहीत आहे का ?
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : चहा हे पेय आपल्‍या जगण्‍याचा भाग झालं आहे. 'तुम्ही चहा पिता का' या प्रश्‍नावर उत्तर  'नाही' असे आलं तर सांगणार्‍याकडे आश्चर्याने पाहिलं जातं. इतका चहा आपल्‍या अंगवळणी पडला आहे; पण आवडीने पिणाऱ्या या चहामुळे काही अपायही हाेण्‍याची शक्‍यता असते.चहा कधी आणि किती प्यावा हे खूप महत्वाचं असते. आज आपण उपाशी पोटी चहा पिला तर होणारे आराेग्‍यावर हाेणारे (Side Effect Of Tea) परिणाम पाहणार आहाेत. 
चहा अस पेय आहे की. जे खुप लोकांना आवडणार पेय आहे.
चहा अस पेय आहे की. जे खुप लोकांना आवडणार पेय आहे.

Side Effect Of Tea : उपाशी पोटी चहा पिण्याचे धोके

बऱ्याच जणांच्‍या दिवसाची सुरुवात ही चहा पिण्याने होते. काहीजणांची तर दिवसातून किती वेळाही चहा प्या; पण त्यांची तलफचं जात नाही.  पण अति चहा पिण्‍याचे तोटेही आहेत. प्रमाणापेक्षा जास्त चहा पिणे, उपाशीपोटी चहा पिणे यामुळे बरेच धोके मानवी शरीरास होत असतात. पाहूया उपाशीपोटी चहा पिण्याचे धोके… 
१) बरेच लोक ताणतणाव, मरगळ घालवण्यासाठी चहा मोठ्या प्रमाणात पितात. चहामधील टॅनिन हा घटक शरीरला तात्‍पुरती उर्जा देतो; पण तो आरोग्‍यासाठी हानीकारक ठरु शकतो. पण उपाशीपोटी चहा पिल्याने ताणतणाव वाढत जातो. थकवा जाणवतो. 
२) चहा हा मानवी पचनसंस्थेवर परिणाम करत असतो. चहा पिताना तुम्ही उपाशी तर नाही ना याची काळजी घ्या.  चहामधील काही घटक हे पचनसंस्थेवर परिणाम करतात, त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. 
३) चहामध्ये डाईयरिटीक तत्त्व असते. जे लघवी प्रक्रियेला गती  देते. तुम्ही जर उपाशीपोटी चहा पिल्यास वारंवार लघवीला जाण्याचे प्रमाण वाढू शकते. 
४) अलिकडे 'बेड टी' चे प्रमाण खूप वाढले आहे. उठल्या-उठल्या सकाळी चहा पिला जातो. पण याचे आपल्या आरोग्याला काही धोकेही आहेत. सचहा अगोदर आणि चहानंतर काही न खाल्ल्याने  पित्ताचा त्रास जाणवायला लागतो, अस्वस्थ वाटते. 
५) रिकाम्या पोटी चहा पिल्याने ह्रदयविकाराची समस्या निर्माण होवु शकतो. त्याचबरोबर थकवा, अल्सर, डोकेदूखी, सांधेदुखी सारखेही त्रासही उपाशीपोटी चहा पिल्याने होतात. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news