किशोरवयीन मुलांसाठी नोव्हावॅक्सच्या कोरोना लसीला परवानगी | पुढारी

किशोरवयीन मुलांसाठी नोव्हावॅक्सच्या कोरोना लसीला परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सध्या देशभरात १२ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. दरम्यान, या वयोगटासाठी नोव्हावॅक्सने (Novavax) उत्पादित केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती नोव्हावॅक्सने (Novavax Inc) दिली आहे.

नोव्हावॅक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे की, १२ ते १७ वयोगटासाठीच्या लसीचा प्रभाव आणि सुरक्षितता आमच्या डेटामध्ये लक्षात आली आहे. आमची ही लस १२ वर्षांच्या मुलांसाठी प्रोटीन-आधारित पर्यायी प्रदान करेल. २ हजार २४७ किशोरवयीन मुलांमध्ये केलेल्या चाचणीत ही लस कोविड-१९ विरुद्ध ८० टक्के प्रभावी आहे. दरम्यान, ४६० भारतीय किशोरवयीन मुलांचा समावेश असलेल्या मध्य ते शेवटच्या टप्प्यातील अभ्यासात समान वयोगटात या लसीने रोगप्रतिकारक क्षमता निर्माण केली आहे.

नोव्हावॅक्स (Novavax) ही कॉरबेवॅक्स, झायडस कॅडिला, झेडवाय कोव्हीडी आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिननंतर किशोरवयीन मुलांसाठी अधिकृत केलेली चौथी लस आहे. भारतात आतापर्यंत १५ आणि त्याहून अधिक वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून १२ ते १४ वयोगटातील मुलांना जैविक ईएस, कॉरबेवॅक्सचे डोस देण्यास सुरुवात केली आहे. तर औषध नियामकाने डिसेंबरमध्ये नोव्हावॅक्सच्या लसीला १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी अधिकृत केली आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ :कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

 

Back to top button