Viral Video : तुमची डिग्री फक्त कागदाचा तुकडा आहे, जर ती तुमच्या वागण्यात दिसत नसेल तर… | पुढारी

Viral Video : तुमची डिग्री फक्त कागदाचा तुकडा आहे, जर ती तुमच्या वागण्यात दिसत नसेल तर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अगदी काळजाला भिडणारे असतात. आता असाच एक असहाय्य महिलेला लहान मुलांनी मदत करणारा व्हिडिओ ( Viral Video )  समोर आला आहे. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘तुमची डिग्री फक्त कागदाचा तुकडा आहे, जर ती तुमच्या वागण्यात दिसत नसेल.’ असे कॅप्शन लिहिले आहे. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

कधी- कधी लहान मुले असं काही करतात की तरूणासोबत प्रौढांना सुद्धा लाजवतात. लहान मुलांचा असाच व्हिडिओ ( Viral Video ) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका असहाय्य महिलेले दोन लहान मुलांनी मदत केल्याचे निदर्शनास आले आहे.

एक महिला हातगाडीवर फळे ( केळे ) विकत असल्याचे दिसते. पहिल्यादा महिलेची हातगाडी रस्त्याच्या एक वळणाच्या चढतीला थांबल्याने ती वारंवार गाडी ढकल्याचा प्रयत्न करते. परंतु, असफल होते. यावेळी दोन लहान मुलांनी हातगाडीला धक्का दिला आणि महिलेसह तिघांनी मिळून ती वरती नेली. याच दरम्यान तिच्या आजूबाजूने अनेक लोक पुढे निघून जातात. पण महिलेला कोणीही मदत करण्यास सरसावत नाही.

यावेळी हातगाडीवर फळांसोबत तिचे चिमुकले मुलं दिसत आहे. महिलेने त्या मुलांना दोन केले खाण्यास दिल्याचे दिसत आहे. या घटवेवरून तरूणाला लाजवेल असे कार्य या लहान मुलांनी केले आहे.

इचलकरंजी नगरपालिकेला पाटबंधारे विभागाचा दणका, कृष्णा योजनेचा पाणी उपसा बंद पाडला

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर करताना अनेक चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस करत दोन्ही मुलांचे कौतुक केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘तुमची डिग्री फक्त कागदाचा तुकडा आहे, जर ती तुमच्या वागण्यात दिसत नसेल.’ असे लिहिण्यात आलं आहे. अल्पावधीतच या व्हिडिओ ८२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, व्हिडिओला १४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button