पुणे : मेट्रोची झालीय ‘फुलराणी’; सकाळ-संध्याकाळी मेट्रो हाउसफुल्ल | पुढारी

पुणे : मेट्रोची झालीय ‘फुलराणी’; सकाळ-संध्याकाळी मेट्रो हाउसफुल्ल

पुणे : पुढारी वृत्तसेवा

नव्याने सुरू झालेली मेट्रो ट्रेन पाहण्यासाठी पुणेकर नागरिक प्रचंड गर्दी करत असून, यात मुख्यत्वे सकाळ आणि सायंकाळ या ‘पीक अवर्स’च्या सुमारास प्रवाशांची गर्दी होत आहे. दुपारच्या वेळी ही गर्दी काही प्रमाणात ओसरली तरी, दुपारी चारनंतर मेट्रो स्थानके पुन्हा गजबजण्यास सुरुवात होते. अद्यापही खऱ्या प्रवाशांची मेट्रोला प्रतीक्षाच असली तरी सध्या मेट्रोची ‘फुलराणी’च झाली आहे.

#CUET : देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये आता कॉमन एट्रांस टेस्टमधूनच प्रवेश मिळणार

महामेट्रो प्रशासनाकडून नुकतेच पहिल्या टप्प्यातील मार्ग सुरू करण्यात आले आहेत. यात वनाज ते गरवारे आणि पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रो ट्रेनची सेवा रोज 13 तास देण्याचे मेट्रो प्रशासनाचे नियोजन आहे. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत ही सेवा मेट्रोकडून निश्चित केलेल्या मार्गावर देण्यात येत आहे. सकाळी 8 वाजता पहिली ट्रेन सुटल्यानंतर दर अर्ध्या तासाला मेट्रोची ट्रेन प्रवाशांसाठी मुख्य स्थानकावरून सुटत आहे. मेट्रोच्या या प्रत्येक गाडीला प्रवाशांचा सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सध्या उत्सुकता म्हणूनच बहुतांश पुणेकर मेट्रोने प्रवास करत असल्याचे दिसत आहे.

एसटी विलीनीकरणावर निर्णय अजूनही नाहीच; सरकारने पुन्हा मुदतवाढ मागितली

‘वीकेंड’ला प्रवाशांची गर्दी

आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवारी बहुतांश पुणेकरांना सुट्या असतात. त्यामुळे ‘वीकेंड’ला मेट्रोत बसण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. असे असले तरी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली मेट्रोची ही सेवा सध्या फुलराणीच्याच भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

Rapper MCTodFod : गली बॉय रॅपर धर्मेश परमारचा कार अपघातात मृत्यू

Opposition walkout : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांचा लोकसभेत सभात्याग

Delhi High Court : दिल्ली दंगलीवरून गांधी कुटुंबीय आणि भाजपच्या नेत्यांना नोटिसा

Back to top button