पुढारी ऑनलाईन डेस्क : Carandbike Award 2022 या स्पर्धेत 'वोक्सवॅगन टाइगून' (Volkswagen Tiguan) या कारने नंबर पटकावला आहे. या स्पर्धेत 'वोक्सवॅगन टाइगून' बरोबर महिंद्रा एक्सयूवी 700, सिट्रॉन सी 5 एयरक्रॉस आणि टाटा पंचसारख्या कार प्रमुख दावेदार होत्या. या स्पर्धेत महत्वाच्या कंपन्यांच्या कार सहभागी झाल्या होत्या. 'कार अँड बाईक अॅवॉर्ड २०२२' या स्पर्धेत 'वोक्सवॅगन टाइगून' (Volkswagen Tiguan) या कारने प्रतिष्ठित कार म्हणून प्रथम स्थान पटकावले, तर महिंद्रा कंपनीची Mahindra XUV700 ही कार या स्पर्धेत उपविजेती ठरली.
'वोक्सवॅगन टाइगून' (Volkswagen Tiguan) ही कार गेल्यावर्षी सप्टेंबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भारतीय मार्केटमध्ये जबरदस्त स्पर्धा करत या कारने आपले स्थान मार्केटमध्ये निर्माण केले आहे. 'वोक्सवैगन टाइगुन' ने हुंदाई कंपनीच्या क्रेटा (Hyundai Creta) कारसोबत स्पर्धा करत, आपल्या ड्राईव्ह आणि प्रदर्शनातून प्रभावित केले आहे. यामध्ये 'किया सेल्टोस' (KIA Seltos), स्कोडा कुशाक (Skoda Kushaq) या कारसोबतही 'वोक्सवॅगन टाइगून' ला स्पर्धा करावी लागली आहे.
या कारचे इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, याला दोन पेट्रोल इंजिन देण्यात आली आहेत. त्याचे 1.0 लिटर 3 सिलेंडर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन 115PS पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट आहे. Volkswagen Tigun 6-स्पीड मॅन्युअल तसेच 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांशी जोडलेले आहे. Taigun हे MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर विकसित केले गेले आहे आणि ते खास भारतीय रस्त्यांसाठी डिझाइन केले गेले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.