चार राज्यांतील विजयानंतर पीएम मोदींची बैठक, पुढील २५ वर्षांच्या विजयासाठी फॉर्म्युला ठरला! | पुढारी

चार राज्यांतील विजयानंतर पीएम मोदींची बैठक, पुढील २५ वर्षांच्या विजयासाठी फॉर्म्युला ठरला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : चार राज्यांच्या निवडणूकांतील मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता २०२४ निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. नरेद्र मोदींनी विजयानंतर राज्यातील नेत्यांशी बातचीत केली. शिवाय पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चार राज्यांतील मंत्रीमंडळ नियुक्त्यांबाबत चर्चा झाली असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशच्या विजयामुळे अनेक दशकांचा इतिहास बदलला

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूका जिंकल्याने भाजपने गेल्या अनेक दशकांचा राजकीय इतिहास बदलला आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान मोदींना घेतलेल्या बैठकीत योगी आदित्यनाथही सहभागी होते. याशिवाय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर चार राज्यांतील मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबिसी यांना मंत्रीमंडळात योग्य स्थान, तर यामध्ये युवानेते, महिला आणि शैक्षणिक योग्यता पाहून मंत्रीमंडळाची रचना केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुढील २५ वर्षे देशात भाजप सत्तेत रहाण्यासाठी कार्यकर्त्य़ांना फॉर्म्युला सांगितला आहे. भाजप आणि देशात नेतृत्व निश्चिच करण्यासाठी युवकांना विशेष महत्व असेल.

संसद सदस्यांवर जबाबदारी

संसद सदस्यांना मतदारसंघात १०० मतदारसंघांची माहिती घ्या, जेथे पक्षाला चांगल यश मिळाले नाही. अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. तर योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळात २० नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ११ मंत्र्यांचा पराभव झाला आणि चार मंत्र्यांनी पक्षांतर केल्याने २० नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

Koo App

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ मराठी कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांची आज पुण्यतिथी ! भव्य दिव्य अशा मराठी साहित्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व सुसंगत, बहुश्रुत आणि अनेक संस्कारांनी संपन्न असे आहे. या महान साहित्यिकाला विनम्र अभिवादन !

Chandrakant Patil (@ChDadaPatil) 14 Mar 2022

हेही वाचलतं का?

 

Back to top button