Crime News: थरकाप उडवणारी घटना! बापानेच १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला, आईने धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ केला शूट; दोघांनाही अटक

Anjar Minor Girl Assault Case: गुजरातमधील अंजार परिसरात १४ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
Anjar Minor Girl Assault Case
Anjar Minor Girl Assault CasePudhari
Published on: 
Updated on: 

Anjar Minor Girl Assault Case: गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजार परिसरात १४ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा आईने मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह आईलाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी एका मुलाशी बोलत असल्याचे पाहून तिचे वडील संतापले होते. त्यांनी मुलीचा मोबाइल फोडला आणि तिला मारहाण केली. त्यानंतर घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी मुलीची आईदेखील तिथे उपस्थित होती आणि तिने या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर मुलीने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी तिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. मात्र, पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच वडिलांनी मोबाइल बंद केला. त्यामुळे पोलिसांना कुटुंबाच घर शोधण्यात अडचण आली.

शुक्रवारी मुलीला पुन्हा मोबाइलचा वापर करण्याची संधी मिळाली. तिने तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून आपल्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अंजार पोलीस ठाण्यात आणले. तेथे तिचा जबाब नोंदवून प्रकरण दाखल करण्यात आले.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा मोबाइल फोन ताब्यात घेतला. त्यामध्ये या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

Anjar Minor Girl Assault Case
Crime News: शिक्षा म्हणून पत्नीला तिच्या प्रियकरासोबत सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले; विकृत कृत्याने देश हादरला

या प्रकरणी वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Anjar Minor Girl Assault Case
INDIA alliance Protest : ‘कोणत्याही पक्षाने बैठकीसाठी वेळ मागितला नाही’, निवडणूक आयोगाचा मोठा दावा

हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील असून गेल्या सहा वर्षांपासून अंजारजवळ राहत होते. कुटुंबातील सदस्य मजुरीचे काम करत होते. आरोपी दाम्पत्याला चार मुली असून, पीडित मुलगी सर्वांत मोठी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news