INDIA alliance Protest : ‘कोणत्याही पक्षाने बैठकीसाठी वेळ मागितला नाही’, निवडणूक आयोगाचा मोठा दावा

कोणत्‍याही राजकीय पक्षाकडून भेटीसाठी अर्ज किंवा विनंती प्राप्त झाली नाही
INDIA alliance Protest
लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. Pudhari
Published on: 
Updated on: 

Election Commission INDIA alliance meeting claim

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ‘इंडिया’ (INDI) आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, निवडणूक आयुक्तांची भेट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींदरम्यान निवडणूक आयोगाच्या मोठा दावा केला आहे.

‘कोणत्याही पक्षाने बैठकीसाठी वेळ मागितला नाही’

आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीसाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडून अद्याप कोणताही अर्ज किंवा विनंती प्राप्त झालेली नाही, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले. ‘पीटीआय’ने दिलेल्‍या वृत्तानुसार ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी आयोगाकडे भेटीची वेळ मागितली आहे का? असा प्रश्न विचारला असता, अधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले. कोणत्याही पक्षाने भेटीसाठी वेळ मागितलेली नाही, असा दावा आयोगाने केला आहे.

INDIA alliance Protest
Election Commission : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार बनावे : राहुल गांधी

विरोधी पक्षांचे आंदोलन नेमके कशासाठी?

निवडणूक आयोगाने राबवलेल्‍या ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेविरोधात ‘इंडिया’ आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने या प्रश्‍नी विचारणा केल्‍यानंतर काँग्रेस पक्षाच्‍या नेत्‍यांनी आज रस्‍त्‍यावरुन उतरुन निवडणूक आयोगाचा निषेध केला. पात्र मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला असून, ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे.

INDIA alliance Protest
Election Commission : निवडणूक आयोग स्वतंत्र असण्यासोबतच तसा दिसायलाही हवा : न्यायमूर्ती दीपांकर दत्ता

दिल्लीत जोरदार राडा

आज (दि. ६) निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणाऱ्या INDIA आघाडीच्या खासदारांचा दिल्लीमध्ये काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी रोखला. संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे निघालेल्या खासदारांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदार संसद मार्गावरच धरणे आंदोलनाला बसले. दरम्‍यान, जंतर-मंतर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 एफआयआर दाखल केले आहेत. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, दंगल आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news