Crime News: शिक्षा म्हणून पत्नीला तिच्या प्रियकरासोबत सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले; विकृत कृत्याने देश हादरला

अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका विवाहित महिलेला आणि तिच्या प्रियकराला कपडे काढून विवस्त्र करत अमानुष अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News
Crime NewsFile Photo
Published on: 
Updated on: 

Gujarat crime news:

राजकोट: अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका विवाहित महिलेला आणि तिच्या प्रियकराला कपडे काढून विवस्त्र करत अमानुष अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली महिलेला आणि तिच्या प्रियकराला सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले गेले, तसेच महिलेची लघवी पिण्यासही लावले गेले. गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

या घटनेचा व्हिडिओ करून आरोपींनी तो सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पीडित महिलेचा शोध घेतला असून, तिच्या पतीसह नऊ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह वापी येथील एका तरुणाशी झाला होता. मात्र, कौटुंबिक वादामुळे ती पतीला सोडून चोटीला येथे तिच्या प्रियकरासोबत राहू लागली होती.

Crime News
Crime news: ६ नराधम, पडकी इमारत अन् धमक्या.., क्लासवरून घरी जाणाऱ्या १३ वर्षांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत नको ते घडलं

काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी तिचा शोध घेऊन तिला वापी येथे परत आणले होते, परंतु ती पुन्हा पळून चोटीला येथे आली. ती पुन्हा तिच्या प्रियकरासोबत असल्याचे समजताच पतीने आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यांनी या जोडप्याचा शोध घेतला, त्यांना सुरेंद्रनगरमधील एका घरात आणले आणि कथित 'शुद्धीकरण विधी'च्या नावाखाली त्यांचा छळ केला.

तक्रारीनुसार, आरोपींनी 'शुद्धीकरण विधी' करणार असल्याचे सांगून या जोडप्याला सुरेंद्रनगरला आणले होते. तिथे त्यांनी त्यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण केली आणि अमानुषपणे वागणूक दिली. त्यानंतर प्रियकराला दोरीने झाडाला बांधण्यात आले, तर महिलेला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. आरोपींनी अत्यंत नीचपणाची सीमा गाठत, त्या तरुणाला आणि महिलेला सार्वजनिक ठिकाणी लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले आणि अमानुष छळ केला. तसेच, त्याला बळजबरीने त्या महिलेची लघवी पिण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर शूटिंग करून ते व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आले.

हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने माहिती दिल्यानंतर सुरेंद्रनगर पोलिसांनी तात्काळ कारवाईचे चक्र फिरवले. पोलीस पथकाने शोधमोहीम राबवून पीडित महिलेची सुटका केली.

'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सुरेंद्रनगरचे डीएसपी प्रेमसुख डेलू यांनी सांगितले की, एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती दिल्यानंतर आणि मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर पोलिसांना या घटनेबद्दल समजले. "एका महिलेवर झालेल्या क्रूर अत्याचाराबाबत मला एका व्यक्तीचा फोन आला होता. आम्हाला अनेक व्हिडिओही आढळले. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली होती. पोलीस पथकांनी परिसरातील घरांची झडती घेतली आणि एका घरात ती महिला सापडली. "पोलिसांना पाहताच ती रडू लागली. व्हिडिओमधील महिलेशी तिचा चेहरा जुळवून पाहिल्यानंतर आम्ही तिला पोलीस ठाण्यात आणले. समुपदेशनानंतर तिने आपल्यावरील अत्याचाराची आपबिती सांगितली," असे डेलू यांनी सांगितले.

Crime News
Crime News : तडजोड करण्याच्या बहाण्याने बोलावले; बहिणीशी बोलल्याच्या रागातून भोसकले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news