Rajyasabha equation : पाच राज्यांच्या निकालानंतर बदलणार राज्यसभेचे गणित : सहयोगी पक्षांच्या मदतीने भाजप बहुमतात, काँग्रेसच्या संख्याबळात मोठी घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

नवी दिल्ली : सागर पाटील
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेचे गणित ( Rajyasabha equation ) देखील बदलणार असून, केंद्रातील सत्ताधारी भाजपचे या सभागृहातले संख्याबळ शंभरच्या वर जाणार आहे. दुसरीकडे सहयोगी पक्षांच्या मदतीने भाजप १२२ च्या संख्याबळापर्यंत म्हणजे बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचणार आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचा मोठा फटका काँग्रेसला बसेल. या पक्षाचे सदनातले चालू वर्षाखेरपर्यंतचे संख्याबळ ३४ वरून २७ पर्यंत कमी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पार्टी वगळता इतर पक्षांची कामगिरी सुमार झाली. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता प्राप्त केली तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपला भरघोस यश मिळाले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी विधानसभेतील या पक्षाच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे भाजप, 'आप' प्रमाणे सपादेखील आपले जास्त खासदार राज्यसभेत पाठविता येणे शक्य होईल. ज्या पक्षांचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, त्यात काँग्रेस, बसपा आणि अकाली दलाचा समावेश आहे.

Rajyasabha equation :राज्यसभेच्या १३ जागांसाठी ३१ मार्च रोजी मतदान

राज्यसभेच्या १३ जागांसाठी अलीकडेच मतदानाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. ३१ मार्च रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. ३१ पैकी पाच जागा पंजाबमधल्या असून केरळमधील तीन, आसाममधील दोन तर हिमाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरामधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. दुसरीकडे चालू वर्षाच्या अखेरीस उत्तर प्रदेशातील ११, बिहारमधील पाच, राजस्थानमधील चार जागांसह इतर अनेक राज्यांतील राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभेचे एकूण संख्याबळ २५० इतके असले तरी २३८ जागांसाठी प्रत्यक्षात मतदान होते. कारण १२ जागा या राष्ट्रपती नियुक्त असतात.

राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला होणार संख्याबळाचा लाभ

विधानसभा निवडणुकीनंतर पाच राज्यांच्या विधानसभांचे पक्षीय बलाबल बदलले आहे. त्याचा फायदा प्रामुख्याने भाजप, आप, सपा या पक्षांना होईल. येत्या काही महिन्यात भाजपचे संख्याबळ ९७ वरून १०४ वर जाईल. जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बदललेल्या संख्याबळाचा लाभ भाजप आघाडीला होईल. राज्यसभेत भाजप आघाडी अजूनपर्यंत अल्पमतात आहे. मात्र भविष्यात आघाडीच्या खासदारांची संख्या १२२पर्यंत जाईल. राज्यसभेत बहुमत प्राप्त करण्यासाठीचा हा आकडा गाठल्यानंतर कोणतेही विधेयक या सदनात विनासायास मंजूर करून घेणे भाजप आघाडी सरकारला शक्य होणार आहे. आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांची संख्या ३ इतकी आहे. पुढील काळात ही संख्या पाचपर्यंत जाऊ शकते. अकाली दलाला पंजाबमधील सुमार कामगिरीचा मोठा फटका बसणार असून या पक्षाची वर्षखेरीस राज्यसभेतील पाटी कोरी राहणार आहे. तिकडे दोन खासदारांचे संख्याबळ असलेल्या बसपाचा केवळ एक खासदार वरिष्ठ सभागृहात शिल्लक राहणार आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news