Uttarakhand election 2022 : हे भाजप उमेदवार चौथ्यांदा होणार आमदार

Uttarakhand election 2022 : हे भाजप उमेदवार चौथ्यांदा होणार आमदार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड विधानसभा निवडणूकांमध्ये बागेश्वर मतदरसंघाचे भाजप उमेदवार चंदन राम दास हे सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. बागेश्वर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यापूर्वी याच मतदारसंघातून चंदन राम दास सलग तीन वेळा निवडून आले होते. या मतदार संघातून ते चौथ्यांदा आमदार होणार आहेत. त्यांनी गेली सोळा वर्ष आमदार लोकप्रतिनिधी म्हणून या मतदरसंघातील जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

भाजप चंदन राम दास हे मतदरसंघातील मजबूत लोकप्रतिनिधीत्व आणि संघटनेतील उत्तम समन्वयासाठी ओळखले जातात. तसे म्हटले तर २०२२ च्या या विधानसभा निवडणूकीत चंदन राम दास यांना पुन्हा एकदा याच मतदरसंघातून तिकीट देत, सट्टा खेळला होता. भाजपच्या चंदन यांना तिकीट मिळवण्यासाठी काही खास प्रयत्नही करावे लागले नाहीत. भाजप उमेदवार चंदन राम दास यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि पक्ष, संघटनेवरील निष्ठा यांमुळे पक्ष आणि पक्षातील जाणकाऱ्यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

चंदन राम दास यांची राजकीय कारकीर्द १९८० मध्ये सुरू झाली. १९९७ मध्ये ते बागेश्वरचे नगरपालिकेचे अपक्ष अध्यक्ष झाले. कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्षात असतानाच ते बिनविरोध सहसचिव झाले होते. त्यांनी १९८० पासून राजकीय जीवनाला सुरुवात केली. २००६ मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रेरणेने भाजपमध्ये प्रवेश केला. २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये ते सलग तिन वेळेस आमदार म्हणून निवडून आले. तिसऱ्यांदा ते १५ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. तर आत्ताच्या निवडणूकीत ते चौथ्यांदा बहुमताने निवडून आले आहेत.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news