Navjot Singh Sidhu : तर सिद्धूच्या मुलीच्या लग्नावर ‘झाडू’ फिरणार ? उत्तर मिळणार पुढील काही तासांमध्ये !

Navjot Singh Sidhu : सिद्धू पराभूत झाले तर त्यांच्या मुलीच्या लग्नाचं काय?
Navjot Singh Sidhu : सिद्धू पराभूत झाले तर त्यांच्या मुलीच्या लग्नाचं काय?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार, त्याचा निकाल १० मार्चला लागणार आहे. दरम्यान, समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना त्यांची जागा गमवावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे झाले तर सिद्धू यांचे भवितव्य काँग्रेसमध्ये कसे असणार? यावर चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. दुसरीकडे सिद्धू यांची मुलगी राबिया हिने नुकतीच तिच्या वडिलांच्या विधानसभा मतदारसंघाला भेट दिली आणि वडील जोपर्यंत जिंकणार नाहीत तोपर्यंत मी विवाह करणार नाही, अशी शपथ घेतली. तिच्या या शपथेनंतर अनेकांना आता तिच्या विवाहाची चिंता होऊ लागली आहे. याला कारण आहे नुकताच प्रसिद्ध झालेला एक्झिट पोल.

१० मार्च हा निकालाचा दिवस आहे. गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीत विजयासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या नेत्यांचे भवितव्य उघड व्हायला आता काही तासच उरले आहेत. उत्तर प्रदेशपाठोपाठ पंजाबच्या विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टी पंजाबात सरकार स्थापन करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे असले तरी, लोकांच्या नजरा अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे आहे. येथे काँग्रेसचे 'गुरू' नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) रिंगणात आहेत. त्यांच्या विरुद्ध अकाली दलाचे नेते बिक्रमसिंग मजिठिया उभे ठाकले आहेत. तर आम आदमी पक्षाकडून जीवन जीत कौर याही निवडणूक लढवत आहेत. एक्झिट पोलनुसार या जागेवर सिद्धू यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ आणि विटो यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, अमृतसर पूर्व जागेवर सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागणार आहे. या जागेवर सिद्धू (Navjot Singh Sidhu) किंवा मजिठिया दोघेही जिंकत नसल्याचा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवन जीत कौर यांचा येथून विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे झाले तर सिद्धू यांच्यासाठी पंजाब काँग्रेसचा मार्ग कठीण होणार आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये अनेकांशी वाकडे..

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे काँग्रेस पक्ष अनेकदा अडचणीत आला आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये त्यांना पसंत करणारे लोक फार कमी आहेत. काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जाखड यांच्यासह पंजाब काँग्रेसच्या दिग्गजांना सिद्धू आवडत नाहीत.

सिद्धू यांच्या मुलीची शपथ चर्चेत..

नवज्योतसिंग सिद्धू यांची मुलगी राबिया हिने नुकतीच अमृतसर पूर्व विधानसभेला भेट दिली. वडील निवडणूक जिंकेपर्यंत मी लग्न करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली. विधानसभा दौऱ्यात राबिया यांना जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागले. निवडणूक जिंकल्यानंतर सिद्धू यांनी या भागाला भेट दिली नाही, असा आरोप लोकांनी केला होता.

काँग्रेस हायकमांडची नाराजी…

काँग्रेस पक्षातील सूत्रांनी सांगितले की, नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबत काँग्रेस हायकमांडमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच सिद्धूऐवजी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यात आले. सिद्धू यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी खूप जोर लावला पण हायकमांडने निकाल त्यांच्या बाजूने लावला नाही.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news