पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल उद्या लागणार असून सर्वच राजकीय पक्ष पुढच्या रणनितीची आखणी करत आहेत. उत्तराखंड राज्यात भाजपाकडून युद्धपातळीवर देखरेखीच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील पक्षाच्या मुख्यालयात आणि जिल्हा कार्यालयात कंट्रोल रूम तयार केलेले जात आहेत.
उत्तराखंड राज्याचे भाजपचे माध्यम प्रतिनिधी मनवीर सिंह चौहान म्हणाले की, "प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या निर्देशानुसार मतमोजणीवरून पक्षाच्या मुख्यालय कार्यालयात कंट्रोल रूम, मीडिया वाॅर रूम तयार करण्यात आली आहेत. तसेच १४ जिल्ह्यांमध्येही कंट्रोल रूम तयार करण्यात आल्या आहेत. मतमोजणीवेळी कोणत्या अडचणी आणि समस्या निर्माण झाल्या की, त्या सोडविण्यासाठी जिल्हा समन्वयक तयार करण्यात आल्या आहेत."
राज्यात काॅंग्रेसनेदेखील मतमोजणीच्या दिवशी चांगलीच तयारी केलेली आहे. उद्या पोलिंग स्टेशनवर काॅंग्रेसचा एक केंद्रीय निरीक्षक तैनात करण्यात येणार आहे. उमेदवारांना मदत करण्याची जबाबदारी निरीक्षकाला देण्यात आली आहे. काॅंग्रेसकडून दावा करण्यात आला आहे की, उत्तराखंडमध्ये काॅंग्रेसच सरकार स्थापन करणार आहे. काॅंग्रेसच्या रणनितीनुसार काॅंग्रेसचा जिंकणारा उमेदवार केंद्रीय निरीक्षकांच्या देखरेखीखाली असेल. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार जिंकणारे उमेदवार काॅंग्रेसशासित दुसऱ्या राज्यात पाठवले जाण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?