नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारतात मागील वर्षी अनेक चिनी अॅप्स बॅन केलेली होती. त्यात सर्वात लोकप्रिय ठरलेलं टिकटाॅक अॅपदेखील होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणात टिकटाॅकवर तरूण युजर्स होते. त्या सर्वांना त्याचा फटका बसला. पण, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टिकटाॅक पुन्हा आपल्या भारतात येण्याची शक्यता आहे.
भारतात टिकटॉक युजर्स होते. टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेकांनी विशेष करून तरुणांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. परंतु आता टिकटॉक पुन्हा येत आहे. टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सने पेटेंट, डिझाईन आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरलसह शॉर्ट व्हिडीओ अॅपसाठी एक ट्रेडमार्क दाखल केला आहे.
६ जुलै रोजी बाइटडान्सने टिकटॉकसाठी TickTock या नव्या टायटलसह ट्रेडमार्क दाखल केला आहे. ट्विटरवर टिपस्टर मुकुल शर्मा यांच्याद्वारे हे रिपोर्ट करण्यात आलं.
समोर आलेल्या माहितीनुसार टिकटॉक देशात पुन्हा आणण्यासाठी बाइटडान्स सरकारशी चर्चा करत आहे. भारतातील नव्या आयटी नियमांचं पालन करण्यासाठी काम करणार असल्याचं आश्वासनही चिनी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना दिलं आहे.
भारत आणि चीनमधील तणावादरम्याम मागील वर्षी सार्वभौमत्व आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाइटडान्सची मालकी असलेलं टिकटॉक बॅन करण्यात आलं.
देशात त्यावेळी टिकटॉकचे जवळपास २० कोटी युजर्स होते. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टिकटॉक प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. मात्र, टिकटाॅकला बॅन केल्यानंतर आणि दरम्यानच्या काळात कोरोना महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म लाॅन्च केले आहेत. त्यालाही युजर्स जास्त आहेत.
पहा व्हिडीओ : पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा