नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अवकाशात दुसऱ्या एखाद्या ग्रहावर एलियन्स असतील तर ते नक्कीच आपल्यावर लक्ष ठेवून असतील. यासंदर्भात खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांची सूची तयार केली आहे.
या सूचीमध्ये अशा ताऱ्यांचा समावेश आहे, ज्यावर एलियन्स असण्याची शक्यता आहे. इतकंच नाही, तर हा ताऱ्यांचा समूह उत्तमस्थितीत आहे. शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडांमधील पृथ्वीशेजारील १७१५ ताऱ्यांच्या समुहाची नोंद केली आहे.
शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, यामध्ये ताऱ्यांवरील एलियन्सकडून पृथ्वीवरील मनुष्यसृष्टीवर नजर ठेवली जाण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांना ५००० वर्षांपूर्वी सूर्यासमोरून पृथ्वी जात असताना या एलियन्सना दिसली असावी.
शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, "सूर्यमालेतील ४६ ताऱ्यांचा समूह पृथ्वीच्या इतके जवळ आलेले आहेत की, त्यातून पृथ्वीवरील मानवाच्या अस्तित्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. हे संकेत रेडिओ आणि टीव्ही प्रसारणाचे आहेत. ज्यांची सुरूवात १०० वर्षांपूर्वीच झाली आहेत."
निष्कर्ष असा आहे की, पृथ्वीवरील मनुष्यसृष्टीचे उत्तम संकेत मिळण्याची परिस्थिती सूर्यमालेत तयार झाली आहे. मनुष्याने तयार केलेल्या टीव्ही आणि रेडिओचे प्रसारण सहजपणे ऐकण्याच्या स्थितीत हा ताऱ्यांचा समूह आहेत. त्यामुळे गृहांवरील एलियन्सला आपल्या अस्तित्वाचे संकेत मिळू शकतात.
यामुळे परग्रहावरील एलियन्स असतील, तर त्यांना पृथ्वीवरील मानवाच्या बुद्धीचा अंदाज येऊ शकतो. खरंच या प्रसारणातून परगृहावरील अत्याधुनिक संस्कृती आणि पृथ्वीवरील मानवी संस्कृती एकत्र येऊ शकतील का, हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे.
खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत सूर्यमालेतील हजारो गृहांचा शोध घेतलेला आहे. त्यातील ७० टक्के ग्रहांनी अवकाशात फिरत असताना स्वतःचा प्रकाश टाकत होते, तो प्रकाश शास्त्रज्ञांनी दुर्बिणीतून टिपला आहे.
भविष्यात अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या दुर्बिणीच्या माध्यमातून वायूमंडळं अधोरेखित करून इतरही ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, याचाही शोध घेतला जाऊ शकतो. नासाचे 'जेम्स स्पेस टेलिस्कोप' नावाची दुर्बीण यंदा अंतराळात सोडली जाणार आहे.
या दुर्बिणीतून अंतराळात असणाऱ्या ग्रहांची स्थितीचं परिक्षण उत्तमरित्या होण्यात मदत मिळू शकेल. अमेरिकेच्आ कार्नेल विद्यापीठाते कार्ल सेगन इन्स्टिट्यूटचे संचालक लिसा काल्टेनेगर आणि त्यांचे सहयोगी डाॅ. जॅकी फाहर्टी यांनी १७१५ ताऱ्यांची नोंद केली आहे.
हे तारे सू्र्यासमोर असणाऱ्या पृथ्वीच्या हलचालींना स्पष्टपणे पाहण्याच्या स्थितीत आहेत. या दोन शास्त्रज्ञांनी २०३४ ताऱ्यांच्या प्रणालीचा शोध घेतला आहे, त्यामध्ये हे तारे पृथ्वीपासून ३२६ प्रकाशवर्षच्या कक्षेत आहेत.
या ताऱ्यांच्या समुहात 'रोस १२८' नावाचा जो तारा आहे, तो पृथ्वीपासून ११ प्रकाशवर्ष इतका जवळ आहे. पृथ्वीवरील रेडिओ आणि टीव्ही प्रसारण ऐकण्याच्या दृष्टीने खूप जवळ आहे. या ताऱ्याचा आकार पृथ्वीच्या दुप्पट आहे. त्यामुळे पृथ्वीवरील मनुष्यसृष्टीचा अंदाज येण्यासाठी पुरेशी परिस्थिती आहे.
पहा व्हिडीओ : कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा…