IPL 2021 : उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; CSKvsMI ने होणार सुरुवात | पुढारी

IPL 2021 : उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; CSKvsMI ने होणार सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क

बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे ( IPL 2021 ) वेळापत्रक जाहीर केले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या या उर्वरित आयपीएल हंगामात २७ दिवसात एकूण ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत.

मे मध्ये सुरु झालेला आयपीएलचा १४ वा हंगाम ( IPL 2021 ) आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने पुढे

ढकलण्यात आला होता. आता हा हंगाम १९ सप्टेंबरपासून दुबईत पुन्हा सुरु होत आहे. या उर्वरित हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टेज सामन्याने होणार आहे.

त्यानंतर अबु धाबीत सामने खेळवण्यात येणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने त्याची सुरुवात होईल. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून शारजात आयपीएलचा तळ हालवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आरसीबी आणि सीएसके या धडाकेबाज सामन्याने होईल.

आयपीएलचे १३ सामने दुबईत होणार आहेत. तर १० सामने शारजात आणि ८ सामने अबु धाबीत होणार आहेत. यामध्ये ७ डबल हेडरचा समावेश आहे. त्यातील पहिला सामना हा दुपारी ३.३० ला होणार आहे. तर दुसरा सामना सायंकाळी ७.३० ला सुरु होणार आहे.

आयपीएल २०२१ मधील साखळी फेरीतील अंतिम सामना हा रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ८ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.

त्यानंतर आयपीएल २०२१ ( IPL 2021 ) मधील पहिला क्वालिफायर सामना दुबईत १० ऑक्टोबर होणार आहे. तर इलिमनेटर सामना ११ ऑक्टोबर ला आणि दुसरा क्वालिफायर १३ ऑक्टोबरला शारजात होणार आहे. आयपीएल २०२१ चा अंतिम सामना दुबईत १५ ऑक्टोबरला होणार आहे.

Back to top button