ओमायक्रॉन सब-व्हेरियंट बीए.१ ग्रस्तांना बीए.२ ची लागण अशक्य | पुढारी

ओमायक्रॉन सब-व्हेरियंट बीए.१ ग्रस्तांना बीए.२ ची लागण अशक्य

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट नोंदवण्यात येत आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचा वेगदेखील वाढला आहे. दरम्यान कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बनवण्यात आलेल्या टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट ‘बीए.२’ संबंधी मोठा दावा केला आहे.

बीए.२ हो कोरोनाचा नवीन व्हेरियंट नाही, तर ओमायक्रॉनचाच सब व्हेरियंट आहे. ओमायक्रॉनचा हा सब व्हेरियंट बीए.१ च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे. पंरतु, हा सब व्हेरियंट कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढीसाठी कारणीभूत ठरणार नाही. बीए.१ ने संसर्गग्रस्त झालेल्या रूग्णांना बीए.२ ची लागण होणार नाही, असे देखील जयदेवन यांनी स्पष्ट केल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

दरम्यान,कोरोना संसर्गाची तिसरी लाट जरी ओसरली असली तरी लसीकरण वेगाने सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना बूस्टर डोस देण्यात येत आहेत. आतापर्यंत ४० लाख ४९ हजार ५०२ आरोग्य कर्मचार्यांसह ५९ लाख ११ हजार २५२ फ्रंटलाईन वर्कर्स आणि ९० लाख २४ हजार ४९५ वयोवृद्धांना बूस्टर डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Back to top button