Aruna Irani : ”पती आधीच विवाहित होता माहित नव्हतं’ | पुढारी

Aruna Irani : ''पती आधीच विवाहित होता माहित नव्हतं'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ८०-९० च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी ( Aruna Irani ) यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांच्यात निर्माण केली. सध्या लग्नाच्या ३२ वर्षांनंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

अभिनेत्री अरुणा इराणीने ( Aruna Irani ) नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत पती आणि चित्रपट निर्माता कुकू कोहलीला आधीच विवाहित असून मुलींचा बाप असल्याचा माहित नसल्याचा खुलासा केला आहे. याबाबतची माहिती देताना तिने ‘माझी आणि कुकू कोहली यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी मी वेळेवर शूटिंगला पोहोचत होते. परंतु, धर्मेंद्र सेटवर येईपर्यंत आम्हाला शूटिंगची वाट पाहावी लागत होती. त्याकाळी माझ्याकडे अनेक चित्रपटाची ऑफर असल्याने मला वेळ कमी पडत होता. याच दरम्यान माझी आणि चित्रपट निर्माता कुकू यांची भांडणे व्हायची. मला त्याचा राग येत होता. यानंतचर ते माझी समजूत काढण्यासाठी यायचे. यातूनच आमच्यात मैत्री आणि नंतर हळूहळू प्रेम होत गेलं. असे सांगितले आहे.’

यापुढे अरुणा सांगितले की, जेव्हा मी कुकू कोहलीला यांना भेटले होते तेव्हा आधीच त्याचे लग्न झालेले आणि त्यांना मुली असल्याचे हे मला माहीत नव्हते. त्यावेळी त्याच्या प्रेमात पडले होते. आजपर्यंत मी त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल कधीच बोललो नाही असे ही त्यांनी यावेळी सांगितले. अभिनेत्री अरुणा यांनी वयाच्या ४४ व्या वर्षी दिग्दर्शक कुक्कू कोहलीशी लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या तब्बल ३२ वर्षांनंतर त्यांनी हा खुलासा केला आहे.

८०-९० च्या दशकात बॉलिवूड राज्य करणाऱ्या अरुणा इराणी यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुकू कोहली हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. ‘फूल और कांटे’, ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘ये दिल आशिकाना’ आणि ‘अनाड़ी नंबर वन’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button