सायकलचा अपमान संपूर्ण देशाचा अपमान : अखिलेश यादव | पुढारी

सायकलचा अपमान संपूर्ण देशाचा अपमान : अखिलेश यादव

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या सायकल चिन्हावर केलेल्या टीकेवर ट्विट करत पलटवार केला आहे. यादव यांनी सोशल मीडियावर एक हिंदी कविता पोस्ट करत भाजपला उत्तर दिले आहे.

सायकलचा अपमान संपूर्ण देशाचा अपमान आहे, असे यादव यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खेत और किसान को जोड़ कर उसकी समृद्धि की नींव रखती है, हमारी साइकल, सामाजिक बंधनों को तोड़ बिटिया को स्कूल छोड़ती है, हमारी साइकल महंगाई का उसपर असर नहीं, वो सरपट दौड़ती है, हमारी साइकल, साइकल आम जनों का विमान है, ग्रामीण भारत का अभिमान है, साइकल का अपमान पूरे देश का अपमान है।

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी हरदोई येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत बोलताना दहशतवाद्यांकडून सायकलचा वापर बॅम्बस्फोट करण्यासाठी केला जात असल्याचे सांगत समाजवादी पक्षावर निशाणा साधला होता. त्याचबरोबर काही राजकीय पक्ष दहशतवाद्यांबद्दल नरमाईचे धोरण स्वीकारत असल्याची टीकाही केली होती.

हेही वाचलं का ? 

Back to top button