कार्यक्रमांचा खर्च तेवढाच; उत्पन्न मात्र निम्मे : सांस्कृतिक क्षेत्राची खंत | पुढारी

कार्यक्रमांचा खर्च तेवढाच; उत्पन्न मात्र निम्मे : सांस्कृतिक क्षेत्राची खंत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सध्या सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरू असले तरी सांस्कृतिक संस्थांना कार्यक्रमांच्या मागे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कारण सांस्कृतिक कार्यक्रमांचे बजेट पूर्वीप्रमाणेच असून, कार्यक्रमांच्या मागे मिळणारे आर्थिक उत्पन्न मात्र घटले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या संस्थांना आर्थिक फटका बसत आहे. कार्यक्रमांना प्रायोजक मिळणेही संस्थांसाठी कठीण झाले आहे. सांस्कृतिक संस्थांकडून विविध सांस्कृतिक महोत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जात असून, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होणार्‍या तिकीट विक्रीलाही फारसा प्रतिसाद मिळत नाही.

EPFO : ईपीएफओ १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना आणणार?

‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, ‘सद्यःस्थितीला 50 टक्के क्षमतेने सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत; पण ते आम्हा सांस्कृतिक संस्थाचालकांना परवडणारे नाही. कारण सभागृहे आणि नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होतील, तेव्हाच सांस्कृतिक कार्यक्रमांमागे चांगले उत्पन्न आम्हाला मिळू शकेल. आताच्या घडीला जोखीम पत्करून आम्ही पूर्वीसारख्या बजेटमध्येच कार्यक्रम आयोजित करत आहोत.’

नारायण राणेंच्या बंगल्यात पालिका पथक दाखल; जुहू तारा रोडवर पोलीस बंदोबस्त

तिकीटविक्री फारशी होत नसल्याने आणि प्रायोजक मिळत नसल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामागे आर्थिक नुकसान होत आहेच. कार्यक्रमांमागे मिळणारे आर्थिक उत्पन्न निम्म्यावर आले आहे. जे कार्यक्रम करण्यासाठी आधी 1 ते 5 लाख रुपये खर्च करायचो. बजेट आजही तेवढेच आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे, असेही ते म्हणाले.

बेळगाव : सीमावासीयांवरील अन्यायाविरूद्ध आवाज बनणार : खासदार डॉ. अमोल कोल्हे

सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजक किशोर सरपोतदार म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यक्रमांमागे मिळणारे आर्थिक उत्पन्न कमीच झाले आहे.
बजेट मात्र तेवढेच आहे. खिशाला कार्यक्रम करणे परवडणारे नसले, तरी सांस्कृतिक वारसा असाच पुढे चालविण्यासाठी कार्यक्रम घ्यावेच लागतात. कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असेल, तर प्रेक्षक कार्यक्रमांना येतात. तिकीट लावले, तर येत नाहीत अशी स्थिती आहे. मग, करायचे काय? आर्थिक नुकसान सहन करत कार्यक्रम करावे लागत आहे.’

Back to top button