Beggar : भिकारीही झाला डिजिटल ; सुट्टे पैसे नसतील डिजिटल 'पेमेंट'चा आग्रह

पुढारी ऑनलाईन :
आजपर्यंत आपण रस्त्याच्या कडेला, बसस्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावर भिकारी भीक मागताना पाहताे. भिकारी म्हटलं की ताे दीन आणि दुबळा असणारच असं आपल्या मनात पक्क बसलेलं असतं. फाटलेले अस्वच्छ कपडे, हातात वाडगं अशा अवतारातील भिकारी डिजिटल पेमेंटने भीक घेताे, यावर तुमचा विश्वास बसेल का? मात्र राजस्थानमध्ये असा भिकारी आहे जाे डिजिटल पेमेंटने भीक घेताेय.
प्रवास करताना एखाद्या भिकाऱ्याने आपल्याकडे भीक मागितली, तर आपण सुट्टे पैसे नाहीत, असं सांगून भिकाऱ्यांना टाळतो. राजस्थानातील भिकारी असलेले, हेमंत सूर्यवंशी हे महापालिकेत काम करत होते. त्यांची नोकरी गेली. यानंतर मागील अनेक वर्ष ते भीक मागत आहेत. डिजिटल भीक मागण्याच्या त्यांच्या अनोख्या पद्धतीमुळे सोशल मीडीयावर ते चांगलेच चर्चेत आहेत.
तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटेल असेल की, हा भिकारी पैसे मागणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचताच आणि समोरची व्यक्ती सुट्टी नसल्याचं कारण सांगू लागली, तर तो लगेचच त्याचा Google Pay आणि Phone Pay चा डिजिटल बार कोड दाखवतो आणि पैसे ट्रान्सफर करायला सांगतो. हा डिजीटल भिकारी साेशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
छिंदवाड़ा में हेमंत सूर्यवंशी नगरपालिका में काम करते थे, नौकरी गई, सालों से भीख मांगते हैं छुट्टे ना हों तो फिक्र नहीं इनके पास गूगल पे की सुविधा भी है :) @ndtvindia @ndtv pic.twitter.com/1YabI0A4ax
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) February 20, 2022
इंटरनेटमुळे जग अधिकच वेगवान झाले आहे. याचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावरही होतो आहे. पूर्वी जे काम अनेक तास करावे लागत होते, तेच मोबाईलवरून करण्यासाठी काही मिनिट पुरेसे आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे लोक सहज बारकोड स्कॅन करू शकतात, असे हा भिकारी सांगतो.
हेही वाचलंत का ?
- Chicken Sweet Corn Soup : काही मिनिटांमध्ये बनवा स्वीट कॉर्न चिकन सूप
- Mataki Racipe : मोड आलेल्या मटकीची उसळ कशी तयार कराल?
- Film Sooryavansham : ‘सूर्यवंशम’मधील भानूला पाहून चाहते म्हणाले…