बरं ते नव्हे त्या सूर्यवंशमधील ‘तो’ खीर घेऊन जाणारा छोटा भानू प्रताप सिंह सध्या काय करतो?

बरं ते नव्हे त्या सूर्यवंशमधील ‘तो’ खीर घेऊन जाणारा छोटा भानू प्रताप सिंह सध्या काय करतो?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' (Film Sooryavansham) हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. पण आजही जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर येतो, तेव्हा चित्रपटप्रेमी हा चित्रपट पाहिल्याशिवाय राहत नाहीत. यातील संवादांनी लोकांना खूप प्रभावित केले. याशिवाय चित्रपटात ट्विस्ट अणणारा एक चेहरा म्हणजे छोटा 'भानू प्रताप'. तोच भानू प्रताप सिंह आता माचो मॅन झाला आहे. त्याचे सोशल मीडीयावरील फोटो पाहून चाहते म्हणाले, 'किती मोठा झाला हा'.

सूर्यवंशम (Film Sooryavansham) या चित्रपटातील कुटुंबात असलेले प्रेम आणि संस्कृतीचे अनुसरण करायला प्रेक्षकांना नेहमीच आवडले आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका आहे. एकीकडे ते ठाकूर भानू प्रताप सिंगच्या भूमिकेत होते, दुसरीकडे हिरा ठाकूरच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांची वाहवा मिळवत होते. याशिवाय चित्रपटात ट्विस्ट अणणारा आणखी एक चेहरा म्हणजे छोटा 'भानू प्रताप'. सोशल मीडीयावर त्याच्या फोटोची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्याचे खरे नाव आनंदवर्धन आहे.

छोट्या भानूचे आत्ताचे रूप कसे आहे. सूर्यवंशमधील (Film Sooryavansham) धाकटा ठाकूर भानू प्रताप सिंग म्हणजेच आनंदवर्धन हा केवळ मोठा माणूसच नाही, तर माचो मॅन बनला आहे. होय, आनंदवर्धनचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील त्याचा लूक पाहण्यासारखा आहे. या फोटोंमध्ये तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोज देत आहे. भानू म्हणजेच आनंदवर्धनचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. यावर एका यूजरने लिहिले की, 'हे तेच निरागस मूल आहे', तर दुसऱ्याने लिहिले की, 'हा इतका मोठा झाला काय?

आनंदवर्धनने अनेक भाषांमध्ये केले चित्रपट

सूर्यवंशमधील (Film Sooryavansham) छोटा 'भानू प्रताप' म्हणजेच आनंदवर्धनने एक नाही तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी एक कन्नड आणि अनेक तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हेही वाचलत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news