छत्रपती शिवाजी महाराज जयंती जळगावमध्‍ये उत्साहात साजरी | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती जळगावमध्‍ये उत्साहात साजरी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा  :  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध देखावे यांसह सजीव देखावे देखील रॅलीत सहभागी झाले. या मिरवणुकीत मोठ्या संख्येत महिला वर्गांनी सहभाग घेतला होता. शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्स येथून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू बंगाळे अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्टेडियम कॉम्प्लेक्सपासून सुरुवात होऊन कोर्ट चौक- नेहरू चौक-टावर चौक-चित्रा चौक व समारोप शिवतीर्थ येथे झाला. मिरवणुकीच्या सुरुवातील ढोल- ताशाचे पथक होते मिरवणुकीमध्ये बाल शिवाजी यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महिला-पुरुष युवक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.  युवक जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत होते.

लहान बालके मावळे होऊन घोड्यांवर स्वार झाले होते. मिरवणूक मध्यवर्ती पोहचल्यावर ढोल-ताशाचा गजर पालक मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी ठेका धरला त्यानंतर दोघांनीही मिरवणुकीत फुगडी खेळली. त्याचबरोबर महिलांचाही फुगड्या मिरवणुकीत रंगल्या होत्या. मिरवणूक शिवतीर्थावर पोचल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवतीर्थावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर मानवंदना केली.

हेही वाचलतं का?

Back to top button