offline classes : पालकांनी ‘ऑफलाईन’ क्‍लासला जाण्‍यास सांगितल्‍याने मुलीची आत्‍महत्‍या | पुढारी

offline classes : पालकांनी 'ऑफलाईन' क्‍लासला जाण्‍यास सांगितल्‍याने मुलीची आत्‍महत्‍या

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था
कोरोना विषाणूचा संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून आपली जीवनशैलीच बदलली आहे. ( offline classes ) याचा परिणाम विद्यार्थ्यांवरही झाला. शाळा आणि क्‍लास हे ऑनलाईन सुरु झाले. मात्र याच ऑनलाईनची विद्यार्थ्यांना इतकी सवय झाली आहे की, आता ऑफलाईन शिक्षणाशी जळवून घेताना अडचणीत येत आहेत. यातूनच आंध्र प्रदेशमध्‍ये धक्‍कादायक प्रकार घडला असून, पालकांनी ऑफलाईन क्‍लास जाण्‍यास सांगितल्‍याने मुलीने आत्‍महत्‍या केल्‍याने राज्‍यात खळबळ उडाली आहे.

मनीषा कोंडापल्‍ली अंजू ही आयआयटी श्रीकाकुलममध्‍ये प्रथम वर्गात शिक्षण घेत होती.यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्‍यापासून ती ऑनलाईन क्‍लास करत होती. कोरोनोची रुग्‍णसंख्‍या ओसरल्‍यामुळे पुन्‍हा ऑफलाईन क्‍लास सुरु झाले. पालकांनी तिला ऑफलाईन क्‍लासला जाण्‍याचा आग्रह केला.

offline classes : गळफास लावून घेत मुलीची आत्‍महत्‍या

पालकांनी आग्रह केल्‍यानंतर मुलीला राग आला. पालक तिला हाॅस्‍टेलला साेडण्‍यासाठी जात हाेते. ऑफलाईन शिक्षणाला विराेध करत तिने आपला मोबाईल फोन बसमधून फेकून दिला. पालकांनी तिला दुसर्‍या दिवशी नवीन फोन घेवून दिला. यानंतर ती पुन्‍हा कॉलेजच्‍या हॉस्‍टेलवर आली. यानंतर ती कोणालाही भेटली नाही. तिच्‍या खोलीचा दरवाजा बंदच होता. विद्‍यार्थींनी याची माहिती हॉस्‍टेल प्रशासनाला दिली. अखेर दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केल्‍यानंतर मनीषा कोंडापल्‍ली अंजूने गळफास लावून घेवून आत्‍महत्‍या केली, असे वृत्त ‘न्‍यू इंडियन एक्‍सप्रेस’ने दिले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button