Corbex vaccine : सुरक्षित असल्याचा एनटीएजीआयचा निष्कर्ष

Corbex vaccine :  सुरक्षित असल्याचा एनटीएजीआयचा निष्कर्ष

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा :

कोरोना नियंत्रणासाठी देशात विकसित करण्यात आलेली कोर्बेवॅक्स लस सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) वर्किंग ग्रुपने काढला आहे. इम्युनिटी तसेच जास्त अँटीबडी विकसित होण्याच्या दृष्टीने ही लस सुरक्षित असल्याचे वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोर्बेवॅक्स लसीचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने परवानगी दिलेली आहे. हैदराबादस्थित बायोलॉजिकल – ई कंपनीकडून कोर्बेवॅक्स लस विकसित करण्यात आली आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कंपनीने लस विकसित केलेली आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डप्रमाणे कोर्बेवॅक्सचेही दोन डोस घ्यावे लागतात.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news