नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: युक्रेन-रशिया तणावाच्या (Russia Ukraine Crisis ) पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांनी मायदेशी परतावे, असा सल्ला युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने एक परिपत्रकाव्दारे केले आहे.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस तीव्र हाेत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने सर्व भारतीय विद्यार्थ्यांना तात्पुरते देश सोडून मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांनी कोणत्याही कामाशिवाय बाहेर पडू नये आणि आवश्यकतेशिवाय युक्रेनमध्ये प्रवास करू नये, असेही म्हटलं आहे. युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही केले आहे. युद्धासारखी परिस्थिती उद्वभवलीच तर भारतीय नागरिकांना मदत करता येईल, असेही दुतावासाने स्पष्ट केले आहे.
युक्रेनमधील दैंनदिन सेवा सुविधांची दुकाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. जेणेकरून युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना या सेवांचा उपयोग होईल. यापूर्वी गेल्या जानेवारीमध्ये युक्रेनमधील भारतीय दूतावासाने एक फॉर्म जारी केला होता. या फॉर्ममध्ये सर्व भारतीय नागरिकांना ३१ जानेवारीपर्यंत या फॉर्ममध्ये आपली माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
किवमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटलं आहे. युक्रेन-रशिया तणाव (Russia Ukraine Crisis ) वाढल्याने बेलारुस, क्रिमिया आणि युक्रेनच्या पश्चिम सीमेवर जवळपास एक लाखांहून अधिक सैनिक रशियाने तैनात केले आहेत.
हेही वाचलंत का?