पुणे महापालिकेत सत्ता भाजपची की अजित पवारांची? केडगाव ग्रामस्थांचा प्रश्न | पुढारी

पुणे महापालिकेत सत्ता भाजपची की अजित पवारांची? केडगाव ग्रामस्थांचा प्रश्न

यवत : पुढारी वृत्तसेवा

साधी पीएमपीएल बस सुरू करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता भाजपची आहे की अजित पवारांची असा प्रश्न भाजपा आमदाराच्या ताब्यात असलेल्या केडगाव आणि बोरिपार्धी परिसरातील नागरिकांना पडला आहे.

ईडीची दक्षिण मुंबईत मोठी छापेमारी; दाऊदच्या संबंधित मालमत्ता कराराप्रकरणी कारवाई

दीड महिन्यांपासून टोलवा टोलवी

सुमारे दीड महिन्यांपूर्वी केडगाव आणि बोरिपार्धी ग्रामपंचायतींनी पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या पीएमपीएल च्या व्यवस्थापना ला पत्र देऊन पीएमपीएल ची बससेवा केडगाव पर्यत सुरू करावी अशी मागणी केली आहे. परंतु अद्याप पर्यत पीएमपीएल च्या अधिकारी वर्गाने केडगाव च्या शिष्टमंडळला आश्वस्त करण्यापलीकडे काहीच केले नाही; तर दुसरीकडे बारामती तालुक्यातील सुपा भागातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत सुपा परिसरात पीएमपीएल ची बससेवा सुरू करावी अशी मागणी केली अजित पवार यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेत त्यांनीं त्वरित पीएमपीएल ला सूचना केल्यानंतर अगदी दोन दिवसांतच पीएमपीएल च्या अधिकारी वर्गाने सुपा परिसरात भेट देत सर्वेक्षण देखील केले. त्यामुळे दौंडचे भाजपचे आमदार असणाऱ्या राहुल कुल यांच्या ताब्यात असणाऱ्या केडगाव ग्रामपंचायत आणि परिसरातील नागरिकांना नेमका प्रश्न पडला आहे, की पुणे महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे की अजित पवारांच्या सुपे भागात बससेवा सुरू करावी याबाबत कोणाचेही दुमत नाही परंतु केडगाव ला कधी असा प्रश्न विचारला जात आहे.

UP Election : सायकलचं बटण दाबलं की, कमळाला मत दिल्याची स्लिप !

पुण्याला कामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी

केडगाव आणि बोरिपार्धी परिसराचा विचार करता शेकडो नागरिक दररोज नोकरी आणि व्यवसाय निमित्ताने पुणे आणि परिसरात प्रवास करत असतात सध्या बससेवा पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करत आहे केडगाव पर्यत बससेवा सुरू झाल्यास बस ला केवळ चार किलोमीटर अंतर वाढवावे लागणार आहे बससेवा केडगाव मधून सुरू झाली तर या बोरिपार्धी आणि केडगाव मधील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे शिवाय बससेवा च्या उत्पन्न मध्ये देखील वाढ होणार आहे परंतु अधिकारी हा निर्णय का घेत नाहीत असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.

मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्‍यासह सोलापूरचे ४ जण ठार

पुणे महानगरपालिका मध्ये भाजपची सत्ता आहे बस सेवा सुरू करावी अशी मागणी करणारी ग्रामपंचायत देखील भाजपच्या ताब्यात आहे शिवाय या भागातील सर्वपक्षीय नागरिकांनी देखील बससेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे. आपल्याच सत्ताधारी यंत्रणेला आपल्याला न्याय देता येत नसेल तर महानगरपालिकेच्या भाजप पदाधिकारी वर्गाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. भविष्यात महानगरपालिका हद्दीत निवडणूक आहे; तसेच ग्रामीण भागात देखील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असणार आहे. आपल्या ताब्यात असणाऱ्या संस्थांमध्ये आपलेच वर्चस्व आणि कमांड आहे हे दाखविण्यासाठी महानगरपालिकेमधील भाजपचे राजकिय पदाधिकारी किती दिवसांत पीएमपीएलच्या आधिकऱ्यांना सूचना देतात आणि अधिकारी त्यांच्या सूचनांची कशी दखल घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Money Laundering : सचिन वाझे, पालांडे, शिंदेची आजपासून पुन्हा चौकशी

पीएमपीएल ची बससेवा सुरू करावी अशी मागणी आम्ही दीड महिन्यांपूर्वी केली आहे परंतु संबंधित अधिकारी केवळ करू पाहू असे सांगत आहेत बससेवा सुरू करावी या मागणीसाठी आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत
 – नितीन जगताप, ग्रामपंचायत सदस्य केडगाव

Back to top button