India vs West Indies : वेस्‍टइंडिज 'टी-२०' मालिकेसाठी ऋषभ पंत उपकर्णधार | पुढारी

India vs West Indies : वेस्‍टइंडिज 'टी-२०' मालिकेसाठी ऋषभ पंत उपकर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
टीम इंडियाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंत यांच्‍यावर मोठी जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे. वेस्‍टइंडिज ‘टी-२०’ मालिकेसाठी (India vs West Indies) तो उपकर्णधार असेल. या मालिकेत केएल राहुल सहभागी होणार नसल्‍याने पंत याच्‍यावर ही जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) स्‍पष्‍ट केले आहे.

India vs West Indies: ऋषभसाठी टी-२० मालिका ठरणार महत्त्‍वपूर्ण

टीम इंडिया वेस्‍टइंडिज विरुद्‍ध तीन टी-२० सामन्‍यांची मालिका खेळणार आहे. बुधवार ( दि. १६) या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. रोहित शर्मा याच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरले. उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्‍याने ऋषभ पंत याच्‍यासाठी ही मालिका महत्‍वपूर्ण ठरणार आहे.

उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्‍याने ऋषभ पंत याच्‍यासाठी ही मालिका महत्‍वपूर्ण ठरणार आहे. त्‍याने आपल्‍या कामगिरीत सातत्‍य ठेवले तर रोहित शर्मा याच्‍यानंतर टी-२० संघाचे नेतृत्‍वासाठी त्‍याच्‍या नावाचा विचार होवू शकतो. त्‍यामुळेच चेतन शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखालील संघ निवड समितीने त्‍याला संधी दिल्‍याचे मानले जात आहे.

ऋषभ पंत याने इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल ) स्‍पर्धेमध्‍ये आपले नेतृत्‍व गुण सिद्‍ध केले आहे. २०२१च्‍या आयपीएल सीजनमध्‍ये त्‍याने दिल्‍ली कॅपिटल्‍स संघाचे नेतृत्‍व केले. त्‍याच्‍या संघाने अंतिम स्‍पर्धेत धडक मारली होती. यंदाच्‍या सीजनमध्‍येही नेतृत्‍व त्‍याच्‍याकडेच आहे.
वेस्‍टइंडिज विरुद्‍धची वनडे मालिकेमध्‍ये भारतीय संघाने निर्वावाद यश मिळवले. तिन्‍ही सामने जिंकत वेस्‍टइंडिजचा व्‍हाईट वॉश केला. अता वेस्‍टइंडिज विरुद्‍धच्‍या टी-२० मालिकेत टीम इंडियाच्‍या ताफ्‍यात ऑफ स्‍पिनरची उणीव असेल. वन डे मालिकेत ऑफ स्‍फिनर वॉशिंग्‍टन सुंदर हा जखमी होता. त्‍याच्‍या ऐवजी आता कुलदीप यावद याला संधी देण्‍यात आली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button