कृषी, प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या निर्यातीत वाढ! ‘अपेडा’ची माहिती | पुढारी

कृषी, प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या निर्यातीत वाढ! 'अपेडा'ची माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशांतर्गत कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ३६ वर्षांपूर्वी देशातील कृषी उत्पादन निर्यात केवळ ०.६ अब्ज डॉलर्स एवढी होती. २०२०-२१ मध्ये ही निर्यात २०.६७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचली. कृषी उत्पादने निर्यात विकास  प्राधिकरणाने (अपेडा) २०५ देशांमध्ये निर्यात विस्तारासाठी सरकारला मदत केली आहे.

गतवर्षी एकूण कृषी उत्पादनांच्या निर्यातीत अपेडाचा वाटा ४९% होता. कडधान्य, ताजी फळे आणि भाज्या (५९%), तृणधान्ये तसेच विविध प्रक्रियायुक्त वस्तू (२३%) आणि प्राणीजन्य उत्पादनांचा (१८%) वाटा आहे. चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये अपेडाला २३.७ अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पैकी २०२२ पर्यंत ७० टक्क्यांपेक्षा अधिक १७.२० अब्ज डॉलर्स साध्य झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे.

कृषी उत्पादनांची निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाने माहिती तंत्रज्ञान-सक्षम उपक्रमांना प्रोत्साहन दिले. अपेडा मोबाइल अँप, टप्प्याटप्प्याने ऑनलाइन सेवा पुरवणे, देखरेख आणि मूल्यमापन,समान सुगम्यता आणि आभासी व्यापार मेळावा यासारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आतापर्यंत, ४१७ नोंदणीकृत जीआय उत्पादने असून सुमारे १५० जीआय टॅग उत्पादने कृषी आणि खाद्यपदार्थ आहेत, त्यापैकी १०० हून अधिक नोंदणीकृत जीआय उत्पादने अपेडा शेड्यूल्ड उत्पादने (कडधान्ये, ताजी फळे आणि भाज्या, प्रक्रिया केलेली उत्पादने) या श्रेणीत येतात.

हे ही वाचलं का  

Back to top button