पुणे : पुढारी वृत्तसेवा
ज्या युगामध्ये समाज अंधारात होता, त्यावेळी या फुले दांपत्याने अनेकांच्या संसारात फुले फुलवली. त्यांनी फक्त पुरतानातून प्रबोधनाचा विचार नाही केला तर ते त्याप्रमाणे जगले देखील. आजही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आपल्यात आहेत; ज्योत मंद तेवत असते, आणि नेहमी लोकांच्या आयुष्यात प्रकाश पाडत असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीकेले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यरी यांच्याहस्ते आज (सोमवार) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'छगन भुजबळ म्हणाले धर्मभेद नको, पण हे आपण राजकारणी लोकं किती पाळतो? नुसता पुतळा उभा केला म्हणजे विद्यापीठ मोठं होणार नाही, आता विद्यापीठावर डोंगराएवढी मोठी जबाबदारी आली आहे, नैतिकतेच ओझं आलं आहे. जगू तर या महात्मा लोकांच्या विचाराने जगू.'
छगन भुजबळ म्हणाले, 'महाविद्यालयामध्ये धर्म भेद थांबवा ओबीसींसह सर्व गोरगरिबांना लवकरच त्यांचा हक्क मिळेल.
परंतु यामध्ये समाजाचा कोणताही आपसी वाद नको. रस्त्यावर येण्यापेक्षा आपण सर्व एकत्रित येऊन समाजाचे प्रश्न सोडवू शकतो.'
कधी कधी मला असं वाटतं कि सावित्रीबाइंचा आत्मा माझ्यात का नाही. कारण जेव्हा मी मेडल्स प्रदान करत असतो, तेव्हा त्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नव्वद टक्के मुली असतात आणि त्यांनी हे पाहिलं असतं, तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
ते म्हणाले, आपण पण प्रयत्न करू शकतो, त्यांच्या चरणांचा आशीर्वाद घेऊन, आदर्श घेऊन आपण चांगल काम करू शकतो आणि असं जर आपण केलं तर तीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल