नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यापूर्वी भाजप आणि समाजवादी पार्टीने आपापले घोषणापत्र जाहीर केले. आता काॅंग्रेसनेही घोषणापत्र जाहीर केले आहे. काॅंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी 'उन्नती विधान' नावाने घोषणापत्र जाहीर केले. (UP Election-Congress)
प्रियंका गांधींनी सांगितलं की, "सर्वांत पहिल्यांदा बेरोजगारी आणि महागाईवर आम्ही जास्त काम केले आहे. १० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले जाईल. २५०० क्विंटल धान-गहू खेरदी केलं जाईल. त्याचबरोबर उसाचा दर ४०० रुपये क्विंटल दिला जाईल. विजेचे बिल अर्ध्याने कमी केले जाईलं किंवा संपूर्ण माफ केले जाईल. २० लाख रोजगार दिले जाईल."
प्रियंका गांधी यांनी सांगितले की, "युपीमध्ये काॅंग्रेसचे सरकार आले, तर ज्या कुटुंबांमध्ये कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या कुटुंबांना २५ हजारांची मदत केली जाईल. १२ लाख रिकामी असेलेली पदं भरली जातील, तर ८ लाख नव्याने पदे निर्माण केली जातील. ४० टक्के महिलांना १० लाखांपर्यंत रुपयांपर्यंत उपचार केले जातील."(UP Election-Congress)
"वन्य प्राण्यांच्या धुमाकूळतेमुळे शेतकरी त्रस्त आहे. छत्तीसगड माॅडेलद्वारे त्यांवर उपाय योजना केल्या जातील. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना ३ हजार रुपये नुकसान दिले जाईल. गोधन न्याय योजना सुरू केली जाईल आणि २ रुपये किलो जनावरांचे शेण खरेदी केली जाईल. छत्तीसगड या योजना सुरू आहेत. छोट्या उद्योगधंद्यांना १ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल", अशी आश्वासनं काॅंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला आपल्या घोषणापत्रातून दिलेली आहेत.
हे वाचलंत का?