OTT : या चित्रपटांसाठीही ओटीटी प्लॅटफॉर्मनी मोजले कोट्यवधी रुपये | पुढारी

OTT : या चित्रपटांसाठीही ओटीटी प्लॅटफॉर्मनी मोजले कोट्यवधी रुपये

पुढारी ऑनलाईन

नेटफ्लिक्सने 80 कोटींमध्ये ‘डार्लिंग्ज’चे हक्‍क खरेदी केले. पण अशीच घसघशीत रक्‍कम विविध ओटीटी प्लॅटफॉर्मनी इतरही चित्रपटांना देऊ केली आहे. त्यावर एक नजर…

आरआरआर

एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’चे ओटीटी हक्‍क तब्बल 300 ते 325 कोटी रुपये मोजून झी फाईव्ह आणि नेटफ्लिक्सने खरेदी केल्याची माहिती आहे. विविध भाषांतील ओटीटी प्रसारणासाठी ही रक्‍कम मोजली गेली आहे. सॅटेलाईट हक्‍कांसाठी मोजलेली ही आत्तापर्यंतची सर्वांत मोठी रक्‍कम आहे.

केजीएफ चॅप्टर 2

कन्‍नड अभिनेता यश याच्या बहुप्रतीक्षित ‘केजीएफ चॅप्टर 2’च्या ओटीटी प्रसारणाबाबतची सर्व माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी दाक्षिणात्य भाषांतील ओटीटी प्रसारणाचेही हक्‍क झी ग्रुपला 100 कोटींना विकले गेल्याचे सांगितले जात आहे.

पठाण

शाहरूख खानच्या पुनरागमनाचा चित्रपट म्हणून अनेकांना प्रतीक्षा असलेल्या ‘पठाण’साठी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने 200 कोटी रुपये मोजले आहेत. थिएटर्समध्ये रीलिज झाल्यानंतर काही काळाने हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर येईल.

टायगर 3

‘पठाण’प्रमाणेच सलमान खान – कॅटरिना कैफच्या ‘टायगर 3’चे डिजिटल राईटस् अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने 200 कोटींना विकत घेतले आहेत.

झुंड

महानायक अमिताभ बच्चनच्या आगामी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’चे ओटीटी प्रसारणाचे हक्‍क 33 कोटींना विकले गेले आहेत.

Back to top button