पुढारी ऑनलाईन: 'फर्जंद' फेम आणि बॉलिवूड अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) आणि त्याची पत्नी रुची सावरान या दोघांच्या घरी एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन झालं होते. यानंतर अंकितने दोन महिन्यानंतर आपल्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर दाखवली आहे.
अंकित मोहन (Ankit Mohan) नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकित मोहन, रुची सावरान आणि दोघांचे बाळ दिसून येत आहे. या फोटोत अंकित निळ्या रंगाच्या शर्टसोबत ब्लॅक रंगाच्या पॅटमध्ये दिसत आहे. तर रुची यावेळी प्रिन्टेंट गाऊनमध्ये दिसली. तर यावेळी बाळाला निळ्या रंगाच्या ड्रेससोबत लाल रंगाची टोपी परिधान केली आहे. या फोटोतील तिघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
यातील आणखी एका फोटोत अंकित आणि रूची आपल्या बाळाला किस करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अंकितने 'Happy 2nd Birthday Ruan ❤️?❤️' लिहिले आहे.
अंकित मोहनच्या पत्नी रुचीने ८ डिसेंबर २०२१ रोजी बाळाला जन्म दिला होता. यानंतर त्यांनी बाळाची एक झलक दाखवली होती. परंतु, या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. यावेळी शेअर केलेल्या फोटोत बाळाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. याच दरम्यान रुचीने बाळाचे नाव रुआन असे ठेवले आहे. तब्बत देन महिन्यानंतर रुआन यांची सोशल मीडियावर झळक दाखलिवी आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेंन्टस करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'क्युट' असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एकाने '❤️❤️❤️❤️❤️❤️ प्रेम प्रेम प्रेम ? त्याला जवळ घेण्यास प्रतीक्षा करू शकत नाही ????', 'रुआनला प्रेम आणि आशीर्वाद' असे लिहिले आहे.
हिंदी आणि मराठी कलाविश्वातील रुची सावरान आणि अंकित मोहन ही लोकप्रिय जोडी आहे. अंकित आणि रुची 'कुमकुम भाग्य' या मालिकेत एकत्रित झळकले होते. तसेच अंकितने 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचलंत का?