

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्यासह जिल्ह्यात 11 लाख 70 हजार 109 जणांनी लशीचा दुसरा डोस अद्याप घेतला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या आकडेवारीहून स्पष्ट झाले आहे.सध्या कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेच्या अगोदर कोरोना प्रतिबंधक लसीचा मंदावलेला वेग वाढला आहे.
मागील आठ दिवसांत शहरासह जिल्ह्यात 92 हजार 881 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पुण्यासह संपूर्ण जिल्ह्यात 83 लाख 42 हजार 700 लाभार्थी आहेत. त्यापैकी जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी पुण्यातील 30 लाख 927, पिंपरी-चिंचवडमधील 17 लाख 66 हजार 600, तर ग्रामीण भागातील 35 लाख 75 हजार 173 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी आतापर्यंत पुण्यात 28 लाख 22 हजार 655 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 14 लाख 86 हजार 888, तर ग्रामीण भागात 28 लाख 63 हजार 48 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पुण्यात दुसरा डोस घेणार्यांचे प्रमाण 94 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 84 टक्के, तर ग्रामीण भागात 80 टक्के प्रमाण आहे, तर एकूण शहरासह जिल्ह्यात दुसरा डोस घेणार्यांचे प्रमाण 86 टक्के एवढे आहे.आठ दिवसांत पुण्यात 5,134, पिंपरी-चिंचवडमध्ये 13 हजार 764, तर ग्रामीण भागात 73 हजार 983 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप शहरासह जिल्ह्यात 11 लाख 70 हजार 109 लाभार्थ्यांनी दुसरा डोस अद्याप घ्यायची बाकी आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या तिसर्या लाटेत दहा मेट्रिक टन ऑक्सिजनच्या मागणीत घट झाली आहे. तिसर्या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजनची मागणी ही केवळ 90.3 मेट्रिक टन होती. ती सध्या दहा मेट्रिक टनने घटून 80.1 मेट्रिक टन एवढी झाली आहे.
जिल्ह्यात दुसर्या लाटेत सर्वाधिक 12 हजार 836 एवढी रुग्णसंख्या नोंदली होती. मात्र, त्या वेळी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या अधिक होती. दुसर्या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजनची मागणी 360 मेट्रिक एवढी झाली होती. ती सध्या केवळ 90.3 मेट्रिक टनापर्यंत गेली.