Hyundai : ‘ह्युंदई’ने काश्‍मीर संदर्भातील वादग्रस्‍त ट्वीट प्रकरणी मागितली भारतीयांची माफी | पुढारी

Hyundai : 'ह्युंदई'ने काश्‍मीर संदर्भातील वादग्रस्‍त ट्वीट प्रकरणी मागितली भारतीयांची माफी

पुढारी ऑनलाईन : नवी दिल्‍ली
जम्‍मू-काश्‍मीरसंदर्भात रविवारी पाकिस्‍तानमधील डिलरने केलेल्‍या वादग्रस्‍त ट्वीट प्रकरणी दक्षिण कोरियातील ‘ह्युंदई’ ( Hyundai ) कार कंपनीने माफी मागितली आहे. तसेच दक्षिण कोरियाचे राजदूतांनीही भारतीयांच्‍या भावना दुखावल्‍याबद्‍दल दु:ख व्‍यक्‍त करत असल्‍याचे म्‍हटलं आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने दक्षिण कोरियाच्‍या राजदुतांना माहिती दिली होती.

Hyundai : पाकिस्‍तानमधील डिलरकडून वादग्रस्‍त पोस्‍ट

पाकिस्‍तानमधील एका ह्युंदई डिलरने काश्‍मीरसंदर्भात वादग्रस्‍त पोस्‍ट केली होती. यानंतर भारतात ह्युंदई कंपनीविरोधात सोशल मीडियावर संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या. या कंपनीवरच बंदी घाला, अशी मागणी होवू लागली होती. भारत -चीन सीमेवरील संघर्षानंतर २०२०मध्‍ये ट्‍विटर युजर्संनी चीनच्‍या मालावर बहिष्‍कार टाकावा, अशी मागणी केली होती. यावर भारतात संतप्‍त प्रतिक्रीया उमटल्‍या.

काही युजर्संनी या कंपनीवर बहिष्‍कार टाकण्‍याची मागणी केली. या प्रकरणी कंपनीने माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियाच्‍या माध्‍यामतून होत होती. ह्युंदई कंपनीने आपल्‍या माफीनाम्‍यात म्‍हटलं आहे की, कंपनी एक दशकाहून अधिक काळ भारतातील ग्राहकांना आम्‍ही सेवा देत आहोत. झालेल्‍या प्रकाराबद्‍दल आम्‍ही सर्व भारतीयांचे मन:पूर्वक माफी मागतो. भारतातील कोणत्‍याही राज्‍यांमधील राजकीय व धार्मिक मुद्‍यांवर कंपनीने भाष्‍य करणार नाही. कंपनीचे धोरण हे स्‍वतंत्र आहे. पाकिस्‍तानमधील एका डिलरने काश्‍मीर संदर्भात वादग्रस्‍त पोस्‍ट त्‍यांच्‍या सोशल मीडिया अकाउंटवरुन केली आहे. अशा असंवेदशनील संवादाचा आम्‍ही तीव्र निषेध करतो. आम्‍ही हे आक्षेपार्ह टविट डिलीड केले आहे. असेही कंपनीने आपल्‍या माफीनाम्‍यात म्‍हटलं आहे.

या प्रकरणाचे पडसाद राज्‍यसभेतही उटमले. केंद्रीय वाणिज्‍य मंत्री पियुष गोयल यांनी याचा तीव्र निषेध केला. तसेच ‘ह्युंदई’ कंपनीने तत्‍काळ माफी मागावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button