IND vs WI 2nd ODI : शिखर धवन आणि श्रेयस अय्यरची कोविड चाचणी निगेटिव्ह! | पुढारी

IND vs WI 2nd ODI : शिखर धवन आणि श्रेयस अय्यरची कोविड चाचणी निगेटिव्ह!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांची कोविड १९ चाचणी निगेटिव्ह आली आहे. निगेटिव्ह आल्यानंतर दोघांना प्रशिक्षणात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. एएनआयने याबाबत एक ट्विट करून माहिती दिली आहे. (IND vs WI 2nd ODI)

सूत्राने एएनआयला सांगितले की, ऋतुराज गायकवाड अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. तर धवन आणि श्रेयस अय्यर यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. ते दोघे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकतात. धवन आणि अय्यर मंगळवारी भारतीय संघासोबत संध्याकाळच्या सराव सत्रात सहभागी होतील. भारतीय संघाचे चार खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे पहिल्या वनडे सामन्यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आले आढळले होते. त्यामुळे हे खेळाडू पहिल्या वनडेच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होते. (IND vs WI 2nd ODI)

टीम इंडियाच्या चार खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटीव्ह अल्यानंतर मयंक अग्रवाल, इशान किशन आणि शाहरुख खान यांना भारतीय संघात सामील करण्यात आले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इशान किशन रोहित शर्मासोबत सलामीला आला. त्याने २८ धावांची खेळी केली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ६ विकेट्सने विजय मिळवला. आता दुसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलचे संघात पुनरागमन झाल्यामुळे रोहित आणि केएल राहुल डावाची सुरुवात करू शकतील आणि इशान किशनला बाहेर बसावे लागेल अशी शक्यता आहे. धवन आणि श्रेयस अय्यर बरे झाले आहेत, परंतु दुसऱ्या वनडेत खेळण्याबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत विधान समोर आलेले नाही. (IND vs WI 2nd ODI)

Back to top button